शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाअभावी गोशाळा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:42 IST

बीडगाव येथील राधाक्रिष्ण साईधाम गोशाळेत गेल्या पाच महिन्यात कत्तलखान्यातून वाचविण्यात आलेल्या जवळपास ५०० गोवंश पाठविण्यात आले.

ठळक मुद्देजनावरांच्या तुलनेत निधी मिळावा : गोहत्याबंदीनंतर संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीडगाव येथील राधाक्रिष्ण साईधाम गोशाळेत गेल्या पाच महिन्यात कत्तलखान्यातून वाचविण्यात आलेल्या जवळपास ५०० गोवंश पाठविण्यात आले. पूर्वी गोशाळेत १८० गोवंशाचे पालनपोषण होत होते. अचानक ५०० जनावरांचा भार वाढल्याने त्यांचा पोषणाचा प्रश्न गोशाळेच्या संचालकापुढे पडला आहे. गोहत्याबंदी कायद्यानंतर अशीच अवस्था राज्यातील अनेक गोशाळेची झाली आहे. त्यामुळे गोशाळा संकटात आल्या आहेत. शासनाने गोशाळेतील पशुधनाचा सांभाळ व संगोपन करण्यासाठी महाराष्ट्रात ३४ जिल्ह्यात ३४ कोटी रुपयांचे अनुदान अर्थसंकल्पात मंजूर केले. मात्र अनुदानाच्या वाटपातही पेच निर्माण झाला आहे.महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. या कायद्यामुळे जनावरांची होत असलेली तस्करी आणि कत्तलखान्याकडे जाणाºया गोवंशाचा बचाव मोठ्या प्रमाणात करण्यात आला. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया करून गोवंश वाचविले. हे गोवंश राज्यातील विविध गोशाळांमध्ये पाठविण्यात आले. या गोवंशामध्ये मोठ्या प्रमाणात भाकड गाई असतात. ज्या शेती, व दूध यासाठी अनुत्पादक असतात. त्यामुळे गोशाळांना या जनावरांपासून कुठलाही लाभ होत नाही. गोशाळेत निव्वळ त्यांचे पोषणच करावे लागते. गोवंश हत्याबंदीच्या कायद्यानंतर गोशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे आली आहेत. त्यांच्यावर होणारा खर्च गोशाळांना परवडण्यासारखा राहिलेला नाही. त्यामुळे गोशाळा चालकांनी शासनाकडे गोवंशाच्या पोषणासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी सरकारकडे केली होती. राज्य शासनाने २०१७-१८ च्या बजेटमध्ये भाकड गाई व गोवंश संगोपनासाठी ३४ जिल्ह्यांसाठी ३४ कोटी रुपये मंजूर केले. परंतु सरकार प्रत्येक जिल्ह्यातील एकाच गोशाळेला एक कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. या निर्णयाचा गोशाळा संचालकांनी विरोध केला आहे. गोवंश हत्याबंदीच्या कायद्यानंतर प्रत्येकच गोशाळेमध्ये जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एक कोटीची रक्कम प्रत्येक गोशाळेत समप्रमाणात वाटण्यात यावी, अशी मागणी गोशाळा संचालकांची आहे.कायद्याला खीळ बसण्याची शक्यताकायद्याच्या अंमलबजावणीनंतर खरंच गोशाळा चालविणे कठीण झाले आहे. गुरांना चारा, त्यांच्यासाठी टिनाचे शेड, पाण्याची व्यवस्था, आरोग्याची काळजी, गुरांची स्वच्छता, परिसराची स्वच्छता यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी खर्च होतो आहे. शासनाने जर एकाच गोशाळेला अनुदान दिले तर कत्तलखान्यातून वाचविण्यात आलेले जनावर इतर गोशाळा ठेवणार नाही, कारण पालनपोषणाचा खर्च वाढला आहे. अनुदानाचे वाटप समप्रमाणात न झाल्यास कायद्यालाही खीळ बसण्याची शक्यता आहे.- मुन्ना शुक्ला, संचालक, गोशाळा