शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

गुंड बाबू बकरी म्हणतो...‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 08:10 IST

Nagpur News नागपूर पोलिसांनी अपराधमुक्त नागपूर अशी मोहीम हाती घेतली असताना गुन्हेगारच पोलिसांच्या मोहिमेला वाकुल्या दाखवत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअटकेतील गुंडाची पोलिसांच्या वाहनातील क्लिप व्हायरल गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही ?

 

नागपूर : नागपूर पोलिसांनी अपराधमुक्त नागपूर अशी मोहीम हाती घेतली असताना गुन्हेगारच पोलिसांच्या मोहिमेला वाकुल्या दाखवत असल्याचे चित्र आहे. हत्येचा आरोपी असलेल्या एका अटकेतील गुंडाची पोलिसांच्या वाहनातील एक ‘व्हिडीओ क्लिप’ प्रचंड व्हायरल झाली आहे. यात त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही भीती जाणवत नसून ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ असे म्हणत तो सरळ सरळ पोलिस यंत्रणेला आव्हान देताना दिसतो आहे. ही ‘क्लिप’ पाहिल्यानंतर गुन्हेगारांवर नागपूर पोलिसांचा वचक आहे की नाही, असा प्रश्नच उपस्थित होत आहे.

पाचपावलीतील कुख्यात गुन्हेगार विरेंद्र ऊर्फ बाबू बकरी रामगडिया याने १३ नोव्हेंबरच्या रात्री अश्विन ऊर्फ गुड्डू इंदूरकर आणि येशुदास उर्फ शॅंकी परमार या साथीदारांच्या मदतीने प्रतिस्पर्धी रोहन बिऱ्हाडे यांची हत्या केली. बाबूचे प्रतिस्पर्धी सौरभ वासनिकसोबत जुने वैर होते. पोलिसांनी सौरभला एमपीडीएअंतर्गत तुरूंगात पाठवले होते. बाबूने सौरभचा मित्र रोहनची साथीदारांच्या मदतीने हत्या केली. ही घटना अत्यंत गांभीर्याने घेत पोलिस आयुक्तांनी एसीपींना चौकशीचे आदेश दिले. बाबू आणि त्याचे साथीदार हे भयंकर गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर कडक पोलिस पाळत ठेवण्यात आली होती. असे असतानाही त्याने पोलिसांच्या वाहनातच बसून 'व्हिडीओ क्लिपिंग' केली. या क्लिपिंगमध्ये तो एकदम बिनधास्तपणे बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांशी बोलताना दिसतो आहे.

पोलिसांच्या गाडीत बसून तो आपल्या सहकाऱ्यांना सांगतो की, आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल. पोलिसांच्या वाहनाबाहेर उभ्या असलेल्या दोन साथीदारांपैकी एकजण चुटकी वाजवताना 'चाकू मारता ये' असे म्हणतो. कोठडीदरम्यान पोलिसांच्या वाहनात बसून खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगाराची क्लिपिंग अत्यंत गंभीर आहे.

आरोपींना सहज मिळतो खर्रा

यानंतर पोलिसांच्या वाहनात बसून 'भांजे कुछ करना मत, आने के बाद ५० लाख की टीप है' असे म्हणतो. यादरम्यान इतर मित्रही उपस्थित असतात. ते त्याला 'कुछ चाहिये क्या, खर्रा मिला क्या' असे विचारतात सर्व काही चांगले आहे. तो हो म्हणत नवीन जॅकेट दिले असते तर बरे झाले असते, असे उद्गार काढतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी