शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गुड बोला.. गोड बोला..; माझ्यातील लहान मूल जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 10:03 IST

सडेतोड पण मनमिळावू, उद्यमशील पण मदतीला नेहमीच तत्पर, झटपट निर्णयासोबत दूरदृष्टिता राखणारे, केवळ नागपूर, विदर्भच नव्हे तर देशाच्या गळ्यातले ताईत बनलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, मकरसंक्रांतीच्या मंगलपर्वावर लोकमतच्या वाचकांशी हितगूज साधत आहेत.. त्यांचा हा शब्दरुपी तिळगूळ..

ठळक मुद्देतुमचे मन लहान मुलासारखे निर्मळ आणि निष्पाप असले पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:आयुष्यात ताणतणाव असणारच. संकटही येत राहणार. पण म्हणून माणसाने आपला मूळ स्वभाव विसरू नये. इतरांशी प्रेमाने बोलणे, त्याच्या सुख-दु:खात सहभागी होणे, त्याचा आनंद आपला मानणे हीच मानवी स्वभावातील मूळ वृत्ती आहे. हे वरदान निसर्गाने इतर सजीवांना दिलेले नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या आनंदात आपण सहभागी झालो पाहिजे, प्रत्येकाला मदत केली पाहिजे.स्पष्ट बोलतो, अनेकदा ते परखडही असते. खरे बोलणे कटू असू शकते पण त्यात निष्पापपणा जास्त असतो. त्यामुळे मी कुणावर रागावलोही तरी दुसऱ्याच क्षणी शांत होतो. त्यामुळे माझे रागावणे कुणाला टोचत नाही. आता या स्वभावाची सर्वांनाच सवय झाली आहे. पण मी कधी कुणाचा मत्सर करीत नाही. माझ्या मनात कुणाबद्दल द्वेषाची भावनाही येत नाही. आपल्याकडे येणाºया प्रत्येक माणसाला आपण काहीतरी दिले पाहिजे ही शिकवण मला माझ्या आईने दिली.ती नेहमी सांगायची, ‘आपल्या दातृत्वाची आपण वहीत नोंद करून ठेवू नये. त्यामुळे अहंकार निर्माण होतो’. एकदा अहंकार निर्माण झाला की मग द्वेष, मत्सर हे रोग आपल्या मनाला जडतात. नंतर शरीरालाही चिकटतात. मला ताण-तणाव येत नाही, असे नाही. तो स्वाभाविक भाग आहे. पण असे झाले की मी गाणे ऐकतो, गुणगुणतोही. चित्रपट बघायला मला आवडतात. पण व्यस्ततेमुळे ते अनेकदा शक्य होत नाही. माणसाने आपली पदप्रतिष्ठा विसरायला हवी. त्यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात. हा एक प्रकारचा योग आहे. मी तो रोज करतो. माझा नातू निनाद परवा मला आईस्क्रीम खायला घेऊन गेला. दिवाळीत त्याने ‘आबा, तुम्हीच मला फटाके घेऊन द्या, असा हट्ट धरला. तो मी पूर्णही केला. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझ्या जगण्याचे समाधान होते. तुमचे मन लहान मुलासारखे निर्मळ आणि निष्पाप असले पाहिजे. माझ्यातील लहान मूल मी अजूनही जपले आहे.या लहान मुलाला प्रत्येक गोष्टीचे कुतुहल असते. मी कुठे गेलो की माझ्यातील हे लहान मूल काहीतरी नवीन गोष्ट शोधत असते आणि शिकवतही असते. आयुष्यात म्हणूनच मी कधी निराश होत नाही. मला माझ्या जगण्याचे प्रयोजन सापडले आहे. त्यामुळे राजकारणात असूनही मी समाधानी आहे. त्या अर्थाने मी आनंदी, सुखी, समाधानी...

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीNitin Gadkariनितीन गडकरी