शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
4
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
5
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
6
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
7
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
8
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
10
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
11
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
12
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
13
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
14
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
15
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
16
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
17
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
18
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
19
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
20
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

आनंदाची बातमी : लोककलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 19:20 IST

लोककलावंतांना मिळणाऱ्या मानधनात दीडपट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तशी घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकलेची सेवा करणाऱ्यांमध्ये आनंद : लोकमतने मांडली होती कलावंतांची बाजू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यभर कलेची सेवा करीत लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणारे लोककलावंत आणि साहित्यिकांसाठी राज्य शासनाकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. लोककलावंतांना मिळणाऱ्या मानधनात दीडपट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तशी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वृद्ध कलावंतांमध्ये आनंद पसरला आहे. शासनाकडून या निर्णयाचा अध्यादेश विभागापर्यंत पोहचण्याची प्रतीक्षा कलावंतांना लागली आहे. विशेष म्हणजे लोककलावंतांच्या तुटपुंज्या मानधनाचा प्रश्न लोकमतने सातत्याने मांडला होता, त्यामुळे जिल्ह्यातील कलावंतांनी लोकमतचेही आभार मानले आहे.शासनातर्फे वृद्ध कलावंतांसाठी शासकीय मानधनाची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत कलावंतांना दर्जानुसार मानधन दिले जाते. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या कलावंताला अ दर्जा देऊन २१०० रुपये मानधन आहे. तर राज्य व जिल्हा पातळीवरील ब व क विभागाच्या कलावंतांना अनुक्रमे १८०० व १५०० रुपये दरमहा मानधन देण्याची योजना आहे. मात्र कलावंतांना मिळणारे हे मानधन अत्यंत तुटपुंजे असून यातून कलावंतांच्या वृद्धापकाळात त्यांच्या औषधांचा खर्च भागविणेही कठीण होते. त्यामुळे आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या या कलावंतांना उतारवयात हलाखीचे जीवन सहन करावे लागते. यासाठी राज्यभरातील कलावंतांच्या संघटनांतर्फे आंदोलन व निवेदन देऊन या प्रश्नाबाबत सरकारला जागविण्याचा प्रयत्न केला. नुकतेच विदर्भ शाहीर कलाकार परिषदेतर्फे मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यानुसार २८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कलावंतांच्या मानधनवाढीबाबत निर्णय घेऊन त्यामध्ये दीडपट वाढ करण्यात आली. शासनातर्फे जाहीर नव्या निर्णयानुसार अ श्रेणी कलावंतांना ३१५० रुपये, ब श्रेणी कलावंतांना २७०० रुपये तर क श्रेणी कलावंतांना २२५० रुपये मानधन देण्यात येणार आहे. या कलावंतांनी आपले सबंध आयुष्य लोककलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यात घालविले. संगीत तमाशा, शाहिरी पोवाडे, लावणी, प्रबोधनकार, देवीचा जागर, गोंधळ, डायका, भारुड, नकलाकार, भजन मंडळ, कीर्तनकार, गीत गायक, नृत्य करणारे व विविध वाद्य वाजविण्यात निपुण कलावंत व साहित्यिकांना या मानधनवाढीचा लाभ मिळणार आहे.राज्य शासनाच्या या निर्णयावर विदर्भ शाहीर कलाकार परिषदेतर्फे अध्यक्ष धर्मदास भिवगडे, जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे, कळमेश्वर तालुका अध्यक्ष अरुण वाहाणे, वृद्ध कलावंत मानधन समिती सदस्य मनोहर धनगरे, नामदेवराव ठाकरे, वसंता कुंभरे (भंडारा), चुडामण लांजेवार व जगन ठाकरे (गोंदिया), हरिभाऊ कार्लेकर (वर्धा) यांनी आनंद व्यक्त केला आहे.६० ऐवजी १०० कलावंतांची होणार निवडलोककलावंतांसाठी आणखी एक आनंदाचा निर्णय शासनाने घेतला आहे. आतापर्यंत मानधनासाठी जिल्ह्यातून ६० कलावंत निवडले जायचे. यावर्षी जिल्ह्यातून ६० ऐवजी १०० कलावंतांची निवड मानधनासाठी करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. दरवर्षी मानधनाच्या निवडीसाठी ३०० ते ४०० कलावंत अर्ज करायचे. मात्र केवळ ६० जणांची निवड होत असल्याने अनेकांची निराशा व्हायची. त्यामुळे जिल्ह्यांची प्रतीक्षा यादीही वाढली होती. १०० कलावंतांच्या निवडीमुळे प्रतीक्षा यादी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातून १०० कलावंतांची निवड करण्यात यावी म्हणून लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता.रखडलेले मानधनही देऊन टाकागेल्या तीन वर्षापासून निवड झालेल्या लोककलावंतांचे मानधन रखडले आहे. २०१७-१८ मध्ये नव्याने मंजूर झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसह आधीच्या कलावंतांनाही गेल्या तीन वर्षापासून वृद्धापकाळ मानधन मिळाले नसल्याने अभावग्रस्त वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, २०१८-१९ या वर्षाला मानधनासाठी आलेल्या लोककलावंतांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे थकीत असलेले कलावंतांचे मानधन त्वरित निर्गमित करावे, अशी मागणी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेने केली आहे.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकartकला