शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज; २२ अंगणवाड्या व १०३ अंगणवाड्यांसाठी १३ कोटी ७५ लाखांचा निधी

By गणेश हुड | Updated: April 24, 2023 19:15 IST

Nagpur News  नागपूर जिल्हयात २४२३ अंगणवाड्या आहेत. यातील ६३७ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नाहीत. या इमारतींच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने १३ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.

गणेश हूड  नागपूर : जिल्हयात २४२३ अंगणवाड्या आहेत.  यात  २१६१ अंगणवाड्या आणि २६२ मिनी अंगणवाड्या आहेत. यातील  ६३७ अंगणवाड्यांना स्वत: च्या इमारती नाही. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने निधीची मागणी केली होती. यातील २२ अंगणवाड्या व १०३ मिनी अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने १३ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.२२ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी  २ कोटी ४७ लाख तर १०३ मिनी अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी ११ कोटी २८ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. 

गतकाळात कोरोनामुळे  दोन वर्षांपासून अंगणवाड्या जवळपास बंदच होत्या. या कालावधीत विकास कामेही ठप्पच होती. त्यामुळे अंगणवाड्यांचे बांधकामही ठप्प होते. त्यात स्थगितीमुळे मागील आठ महिन्यापासून जिल्हयातील विकास कामे थांबली होती.  याचा फटका अत्यावश्यक कामांनाही बसला आहे.  ग्रामीण भागातील अंगणवाड्यातील बालकांना नाईलाजाने खुल्या जागेचा वापर करावा लागतो. जिल्हयात २४२३ अंगणवाड्या आहेत. मात्र यातील ५३१ अंगणवाड्यांत शौचालयाची सुविधा नाही. काही ठिकाणी तर पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध नसल्याने बेअरवेलचे पाणी पीत असल्याचे चित्र आहे. एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांर्गत अंगणवाड्यांचे संचालक केले जाते. ६३७ अंगवाड्यांना स्वत:च्या इमारती नाहीनियमानुसार १ हजार लोकसंख्येमागे एक अंगणवाडी सुरू करणे अपेक्षित आहे. जिल्हयात सध्या २४२३  नियमित व मिनी अंगणवाड्या सुरू आहेत. यात हजारो बालकांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यातील ६३७ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत नाही. परिणामी सरकारी शाळा, समाज मंदीर, ग्रामपंचायत कार्यालय अशा ठिकाण एका खोलीत काही अंगणवाड्या सुरू आहेत. जवळपास ३०० अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत सुरू आहेत. अशा ठिकाणी कुठल्याही स्वरुपाच्या मुलभूत सुविधा नाही. ...

टॅग्स :GovernmentसरकारEducation Sectorशिक्षण क्षेत्र