शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोंडेगाव उपसरपंचाच्या हत्येत झाली होती मोठी ‘डीलिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 20:37 IST

कोळसा माफियाने आपला दबदबा बनवण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुवर यांची हत्या केली होती. विनोदच्या हत्येच्या बदल्यात आरोपींना मोठी रक्कम मिळाली होती. विनोदच्या हत्येच्या प्रकरणातील गुन्हेगार राजा बुंदेले याची विचारपूस करताना उपरोक्त बाब उघडकीस आली. गुन्हे शाखा पोलिसांनी राजा आणि त्याचा साथीदार मो. गुलाम मो. वकील सिद्दीकी रा. कन्हान याला पिस्तुल व काडतुसासह अटक केली होती.

ठळक मुद्देकोळसा माफियाने अगोदरच आखली होती योजना : गुन्हेगार राजा याच्या बयानात खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोळसा माफियाने आपला दबदबा बनवण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुवर यांची हत्या केली होती. विनोदच्या हत्येच्या बदल्यात आरोपींना मोठी रक्कम मिळाली होती. विनोदच्या हत्येच्या प्रकरणातील गुन्हेगार राजा बुंदेले याची विचारपूस करताना उपरोक्त बाब उघडकीस आली. गुन्हे शाखा पोलिसांनी राजा आणि त्याचा साथीदार मो. गुलाम मो. वकील सिद्दीकी रा. कन्हान याला पिस्तुल व काडतुसासह अटक केली होती.कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुवर यांची २९ जून रोजी पारशिवनी टोल नाक्याजवळ हत्या करण्यात आली होती. सूत्रानुसार या हत्येचा सूत्रधार सोनू वनवे रा. म्हाळगीनगर हा आहे. सोनू कोळसा तस्करीत सामील आहे. विनोद राजकारणात सक्रिय असल्याने कोळसा व्यापारात त्याचा दबदबा निर्माण झाला होता. सोनूला तस्करी करण्यात अडचण येत होती. त्याचा व्यवसाय ठप्प पडला होता. त्यामुळे विनोद सोनूच्या नजरेत खुपत होता. सोनू कोळसा तस्करी करतांना राजा बुंदेलेसह शहरातील अनेक गुन्हेगारांची मदत घ्यायचा. त्यांच्या मदतीने तो तस्करीच्या मार्गात बाधा निर्माण करणाऱ्यांना धमकावयाचा किंवा त्यांच्यावर हल्ला करायचा. सोनूने राजा व इतर आरोपींना विनोदची हत्या करण्यासाठी तयार केले. या मोबदल्यात त्यांना मोठी रक्कम देण्याचे आश्वासनही दिले. त्याने साथीदारांना सांगितले होते की, विनोद त्याची हत्या करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर संपवायचे आहे. घटनेच्या दिवशी २९ जून रोजी सकाळपासूनच आरोपी विनोदवर पाळत ठेवून होते. त्यांना विनोदचा येण्याजाण्याचे अगोरच माहिती होते. योजनेनुसार विनोदची हत्या कल्यावर सर्व आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले होते.पोलिसांनी विचारपूस केली असता राजाने ग्रामीण भागात कोळशाची सर्रास तस्करी होत असल्याचे सांगितले. त्याच्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या सीमेत एक डझनपेक्षा अधिक कोल माफिया आहेत. येथे दररोज लाखो रुपयांचा कोळशाची तस्करी केली जाते. त्यांचे ग्रामीण पोलिसांसोबतही संगनमत आहे. विनोदच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला नितीन देशमुख नावाचा आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. कोल माफिया हे गुन्हेगार आणि पोलिसांच्या मदतीनेच सक्रिय आहेत. त्यामुळेच राजाचीही सोनूसोबत जुनी मैत्री आहे.

तरीही सक्रिय आहेत कोल माफिया विनोद यांच्या हत्येनंतरही ग्रामीण पोलिसांच्या सीमेत कोल माफिया सक्रिय आहेत. खापरखेड्यातील दहेगाव येथे अरविंद, पारशिवनीमध्ये यादव, कन्हानच्या गोडेगावात उमेश आणि उमरेडमध्ये संजय हे पोलिसांच्या नाकावर टिच्चून कोळसा तस्करी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी उमरेड येथील गँगरेपच्या घटनेतही कोल माफियांना संरक्षण देण्यासाठी वेकोलि व्यवस्थापनाद्वारे घटनास्थळावर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना हटविण्यात आल्याचे आरोप लागले होते. दोन्ही घटनांनंतरही कोल माफिया सक्रिय असल्याने पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून