शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोमासे व मिश्रा यांनी संगनमताने केला शिष्यवृत्ती घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. अशोक गोमासे व सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांनी संगनमताने शिक्षण शुल्क वाढवून शिष्यवृत्ती घोटाळा केल्याचा निष्कर्ष प्रकरणाच्या चौकशी अहवालात नोंदविण्यात आला आहे. हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश जी.एम. कुबडे यांनी प्रकरणाची चौकशी केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात चौकशी अहवाल : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूटमधील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. अशोक गोमासे व सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांनी संगनमताने शिक्षण शुल्क वाढवून शिष्यवृत्ती घोटाळा केल्याचा निष्कर्ष प्रकरणाच्या चौकशी अहवालात नोंदविण्यात आला आहे. हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश जी.एम. कुबडे यांनी प्रकरणाची चौकशी केली आहे.मिश्रा यांनी बुधवारी या अहवालावर उच्च न्यायालयामध्ये आक्षेप दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने ते आक्षेप रेकॉर्डवर घेऊन अन्य पक्षकारांना त्यांचे काही आक्षेप असल्यास ते दोन आठवड्यात दाखल करण्याचे निर्देश दिलेत. यासंदर्भात उमेश बोरकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम-१९९४ मधील कलम ५३ अनुसार शैक्षणिक शुल्काबाबतचे नियम/आदेश जारी करण्याचे अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला आहे. परंतु, मिश्रा यांनी गोमासे यांना हाताशी धरून ५ डिसेंबर २०१३ रोजी शिक्षण शुल्कवाढीचे अवैध पत्र काढून घेतले. त्या बळावर मिश्रा यांनी २०१३-१४ शैक्षणिक सत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मंजूर ५९ लाख २६ हजार ३३ रुपयांची शिष्यवृत्ती अवैधपणे उचलली असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात अ‍ॅड. श्याम मोहता न्यायालय मित्र असून याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. पी. दुबे, गोमाशे यांच्यातर्फे अ‍ॅड. विक्रम मारपकवार, इन्स्टिट्यूटतर्फे प्रा. सुनील मिश्रा तर, विद्यापीठातर्फे अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयScholarshipशिष्यवृत्ती