शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

‘सीआरपीएफ’ मध्ये गोलमाल

By admin | Updated: October 27, 2016 02:10 IST

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये पदभर्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बाब उघडकीस आली आहे.

पदभर्तीचा पेपर फुटलाव्हॉट्सअ‍ॅपवर पाठविली प्रश्नपत्रिका पर्यवेक्षक हवालदारास अटकनागपूर : केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये पदभर्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बाब उघडकीस आली आहे. ही घटना हिंगणा येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूल सेंटरमध्ये घडली. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. यानंतर सीआरपीएफने आरोपी हवालदार नसीम खान याला अटक करून एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. २३ आॅक्टोबर रोजी सीआरपीएफ तर्फे हवालदार पदासाठी देशभरात भर्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. नागपुरातील तीन सेंटरमध्ये सुद्धा ही परीक्षा होती. यापैकी हिंगणा येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूल हे एक परीक्षा केंद्र होते. या परीक्षा केंद्रात ६३ उमेदवारांना परीक्षेसाठी बसवण्यात आले होते. खोली क्रमांक १५ मध्ये नसीम खान हा पर्यवेक्षक होता. सकाळी ९.३० वाजता प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात येणार होते. नसीम खानकडे सकाळी ९.०२ वाजता एका बंद पॉकेटमध्ये प्रश्नपत्रिका सोपवण्यात आल्या. त्याने प्रश्नपत्रिका मिळताच. सीलबंद पॅकेट उघडले. प्रश्नपत्रिकेचा मोबाईलने फोटो काढला आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लोकांना पाठविला. हा सर्व प्रकार केंद्रातील उमेदवार पाहत होते. त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी परीक्षा केंद्रातील सुपरवायजर विक्रांत सारंगपणी आणि सहायक कमांडंट सुबोध कुमार सिंह यांना ही बाब सांगितली. दोन्ही अधिकारी लगेच नसीम खानकडे गेले. त्याचा मोबाईल जप्त केला. मोबाईलची तपासणी केली असता त्याने दोन लोकांना प्रश्नपत्रिका पाठवल्याचे आढळून आले. सहायक कमांडंट सुबोध कुमार सिंह यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एपीआय प्रभाकर शिऊरकर यांनी भादंवि कलम ४६२ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून नसीमला अटक केली. या घटनेमुळे सीआरपीएफ अधिकारी हादरले आहेत. (प्रतिनिधी)देशभरात नेटवर्क सूत्रानुसार नसीमने प्रश्नपत्र ‘लीक’ करीत मोबाईलद्वारे ते दिल्लीला पाठविले होते. तेथून उत्तर प्रदेशातील रामपूरसह देशभरातील शहरांमध्ये पाठवण्यात आले. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला, अन्यथा याबाबत कुणालाच काही कळले नसते. या प्रकरणामुळे दिल्ली व रामपूरमध्ये वादळ उठले आहे. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी इतर ठिकाणीसुद्धा याप्रकरणी तक्रारी दाखल केल्या आहेत.