शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

सिनेगीतांचा सुनहरी यादे....

By admin | Updated: June 23, 2014 01:23 IST

काही गीतांचे भावपूर्ण शब्द मनाच्या सांदीकोपऱ्यात कायम विसावलेले असतात. रुपेरी पडद्यावरील अशा गीतांच्या प्रसंगाच्या काही खास आठवणींशी श्रोत्यांचेही भावबंध अतूट जुळलेले असतात.

रोटरी क्लब : स्पंदनचे आयोजन नागपूर : काही गीतांचे भावपूर्ण शब्द मनाच्या सांदीकोपऱ्यात कायम विसावलेले असतात. रुपेरी पडद्यावरील अशा गीतांच्या प्रसंगाच्या काही खास आठवणींशी श्रोत्यांचेही भावबंध अतूट जुळलेले असतात. अशाच खास हिंदी सिनेगीतांच्या ‘सुनहरी यादे...’ या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक सभागृहात आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब व स्पंदनतर्फे क रण्यात आले. कार्यक्रमात लोकप्रिय गीतांनी रसिकांचा ताबा घेतला. विनय शुक्ला, मयंक लखोटिया, यशश्री भावे - पाठक, सोनाली दीक्षित या नव्या जुन्या गायकांचा सहभाग असलेल्या या सादरीकरणात मधूर अनुभूतीच्या सिनेगीतांचा समावेश होता. विनय व यशश्रीने ‘दिल पुकारे आरे आरे..’ या गीताने प्रारंभ केला. प्रतिभावंत शायर, संगीतकारांच्या अपूर्व योजकतेतून दिग्गज गायकांच्या स्वरातून साकार झालेली ही गाते आजही लोकप्रिय आहेत. याप्रसंगी सर्वच गायकांनी तयारीने सादरीकरण करुन रसिकांची दाद घेतली. मयंक लखोटियाने ‘तुमने मुझे देखा.., ये दुनिया उसी की.., अभी ना जाओ छोडकर...’ आदी गीतांनी खास समां बांधला. यशश्रीने ‘रंगीला रे...’ विनयसह सादर केलेले ‘चुडी नही मेरा दिल है...’मयंकसह सादर केलेले ‘अभी ना जाओ छोडकर...’ या गीतांना रसिकांनी खास दाद दिली. सोनालीने ‘पिया तोसे नैना लागे रे..’ हे गीत भावपूर्णतेने सादर केले. यावेळी ‘फुलो के रंगसे..., अच्छा जी मै हारी पिया...दिवाना हुआ बादल..., खोया खोया चाँद...’ आदी गीते सादर करण्यात आली. यात प्रामुख्याने देवानंद व शम्मी कपूर यांच्यावर चित्रित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संगीत संयोजन पवन मानवटकर यांनी केले. गायकांना अशोक टोकलवार, रुनंदन परसटवार, सुभाष वानखेडे, तुषार विघ्ने, पवन मानवटकर, रिंकु निखारे, प्रकाश चव्हाण यांनी विविध वाद्यांवर साथसंगत केली. नासिर खान यांचे निवेदन होते. स्पदंन संस्थेच्या दुर्बलमनस्क मुलांच्या मदतीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेचे संचालक पांडुरंग सोनवणे, प्रतिकृतीचे विनय शुक्ला, मिलिंद तोतरे, तिवारी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. (प्रतिनिधी)