शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक नाटकांच्या पायाभरणीची सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:05 IST

नागपूरकर नागपूरचीच नाटके बघायला येत नाहीत, यासाठी सर्वस्वी कलावंतच जबाबदार आहेत आणि हीच जबाबदारी समजून शहराच्या नव्या भागांमध्ये नाटक म्हणजे काय, हे समजावून सांगण्याचे कार्य रंगकर्मींना करावे लागणार आहे.

ठळक मुद्देनाट्य संस्थांनी त्या दिशेने काम करणे गरजेचेस्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्याची गरज

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यावसायिकता नसली किंवा व्यावहारिक दृष्टिकोन नसला की हौसेला तितकेसे मोल नसते. नेमकी हीच बाब विदर्भातील हौशी रंगकर्मींनी समजून घेणे गरजेचे आहे आणि ती संधी लॉकडाऊनने दिली आहे.नाटकांमधील व्यावसायिकता म्हटली की थेट नजरा वळतात पुणे आणि मुंबईकडे अन् हौशी नाटके म्हटली की विदर्भाकडे! पण, विदर्भातही झाडीपट्टी रंगभूमीने तद्दन व्यावसायिकता जपली आहे, याचा विसर जसा अनेकांना पडतो तसाच तो हौशी रंगकर्मींनाही पडतो. यामुळेच हौशी रंगकर्मी व्यावसायिक स्पर्धेत एकटी पाडत असल्याचे वारंवार दिसून येते. उत्तम कलागुण व कलामूल्य असूनही केवळ व्यावसायिकता नसल्यामुळे हौशी रंगकर्मींचे नाट्यक्षेत्रातील स्थान उपऱ्यासारखेच आहे. त्यामुळेच, हौशी रंगकर्मींच्या मागण्यांचे सरकारला तेवढेसे महत्त्व वाटत नाही अन् नाईलाजाने पालक म्हणवल्या जाणाºया नाट्य परिषदेची तर हौशी म्हणजे फालतू अशी ठाम समजूत झाली आहे.कोरोनाच्या प्रकोपामुळे आता पुढचे काही महिने तरी सिनेमागृहे व नाट्यगृहे खुली होणार नाहीत. त्यामुळे, हौशी असो वा व्यावसायिक नाट्यक्षेत्राचे गणित तर पार कोलमडले आहे. सगळेच एकजात रंगमंचीय वावरापासून अलिप्त झाले आहेत. संपूर्ण टाळेबंदीतून जेव्हा बाहेर पडायचे असेल, तेव्हा सगळ्यांसाठीच नवी सुरुवात असणार आहे. या सुरुवातीला सुवर्णसंधीत परावर्तित करण्याची संधी हौशी रंगकर्मींनी करणे गरजेचे आहे.

पेलावे रसिकनिर्मितीचे आव्हानपुणे-मुंबईच्या व्यावसायिक नाटकांना नागपूरमधूनच मोठ्या प्रमाणात रसिक मिळतात. मात्र, नागपूरच्याच नाटकांना नागपूरकर प्रतिसाद देत नाहीत, अशा तक्रारी वारंवार आल्या आहेत. या तक्रारी चुकीच्या नाहीत. मात्र, नागपूरच्या रंगकर्मींनी स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्याकडे जाणीवपूर्वक कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे नागपूरकर नागपूरचीच नाटके बघायला येत नाहीत, यासाठी सर्वस्वी कलावंतच जबाबदार आहेत आणि हीच जबाबदारी समजून शहराच्या नव्या भागांमध्ये नाटक म्हणजे काय, हे समजावून सांगण्याचे कार्य रंगकर्मींना करावे लागणार आहे.

कलावंतांना आत्मनिर्भर होण्यासाठी द्यावे प्रोत्साहनज्याप्रमाणे कलावंतांनी रसिकनिर्मिती करण्याचे आव्हान पेलण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे रसिकांनीही कलावंतांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. दुसऱ्याचे ते चांगले आणि आपले ते वंगाळ, या दुराग्रहातून रसिकांनी बाहेर पडावे आणि आपल्या कलावंतांना पाठबळ दिले तर कलावंतांना धीर मिळणार आहे.

नागपूरच्या गायकांकडून धडा शिकणे गरजेचेनागपुरात हिंदी, मराठी चित्रपटगीतांचे कार्यक्रम मोठ्या संख्येने होतात. प्रारंभी हौस म्हणून गायनास सुरुवात करणारे आज व्यावसायिक गायक म्हणून स्थापित झाले आहेत. दर आठवड्यात या कलावंतांचे गायनाचे कार्यक्रम होतात आणि रसिकवर्गही मोठ्या संख्येने तिकीट काढून येत असतो. याच गायकांकडून हौशी रंगकर्मींनी धडा घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक