शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सोने ३२ हजारांवर, सराफा बाजारात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 01:50 IST

शेअर बाजारातील मरगळ आणि काही क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. तब्बल सहा वर्षांनंतर धनत्रयोदशीआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप घेतली असूनही सराफा बाजारात उत्साह आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह शेअर बाजारातील मरगळ पाहता गुंतवणूकदारांची पसंती सर्वाधिक परतावा देणाऱ्या सोन्याला असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

ठळक मुद्देदिवाळीत बाजारपेठांमध्ये उत्साह : सुकामेव्याला मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेअर बाजारातील मरगळ आणि काही क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. तब्बल सहा वर्षांनंतर धनत्रयोदशीआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप घेतली असूनही सराफा बाजारात उत्साह आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह शेअर बाजारातील मरगळ पाहता गुंतवणूकदारांची पसंती सर्वाधिक परतावा देणाऱ्या सोन्याला असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.ग्राहकांचा बुकिंगवर भरदसऱ्यापासून सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होत असून, त्यासाठी सोने खरेदी व बुकिंग सुरू झाले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होईल, अशी अपेक्षा सराफांनी व्यक्त केली. नागपुरात शनिवारी सोन्याचे दर ३२,६०० रुपये असतानाही दुकानांमध्ये गर्दी होती. याशिवाय दोन ते तीन वर्षांपासून आॅनलाईन सोने खरेदीत जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानंतरही पारंपरिक सराफाकडे खरेदीदारांची गर्दी दिसून येत आहे. लग्नसमारंभात वापरण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्ये पारंपरिक दागिन्यांना नवा साज देण्याचा ट्रेंड आल्याचे सराफांनी सांगितले. या ट्रेंडमध्ये सोन्याच्या दागिन्यांत खडे, हिरे बसवण्याची मागणी होत आहे. एकूण पाहता यावर्षी सोन्याचे दर वधारूनही सराफा बाजारासाठी दिवाळी ‘अच्छे दिन’ घेऊन आल्याचे चित्र आहे. धनत्रयोदशीला लक्ष्मीचे चित्र असलेल्या सोने आणि चांदीच्या नाण्यांना जास्त मागणी राहील, अशी अपेक्षा राजेश रोकडे यांनी व्यक्त केली.ग्राहकांची बाजारात प्रत्यक्ष खरेदीसाठी गर्दीदिवाळी अवघ्या काही दिवसांवर ठेपली असून बाजारातील लगबगही सुरू झाली आहे. त्यातच नोकरदार वर्गाचे पगार व बोनसही झाल्याने बाजारपेठेत आता खरेदीचा उत्साह जाणवू लागला आहे. आॅनलाईन पोर्टल्सवर शॉपिंग फेस्टिव्हल सुरू असला तरीही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. यंदा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

सुकामेव्याला मागणी वाढलीदिवाळीच्या तोंडावर सर्वाधिक मागणी गोडपदार्थांना असते. मात्र, मागील काही वर्षांपासून अनेकांनी बाजारात गोड पदार्थांऐवजी सुकामेव्याकडे कल वाढविला आहे. मिठाईत भेसळ किंवा जास्त काळ टिकत नसल्यामुळे नागपूरकरांची आकर्षक वेष्टनातील सुकामेव्याला जास्त मागणी आहे. सुकामेवा टिकाऊ असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाव परवडणारे आहेत. बाजारात सुकामेव्याच्या आकर्षक गिफ्ट बॉक्सची रेलचेल आहे. ३०० रुपयांपासून ३ हजारांपर्यंत पॅकिंग आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचे भाव पाहिल्यास काजू, किसमिस, बदाम, पिस्ता आणि अंजीरचे भाव कमी झाले आहेत. बॉक्स किफायत दरात आहेत. 

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार