लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कराटेपटू कुणाल हाडके याने मलेशियातील आंतरराष्टÑीय ओपन कराटे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याच्या सहकारी खेळाडू अन्वेषा बोस आणि महिका गर्ग यांनीही पदकांची कमाई केली. १६ वर्षांच्या कुणालने २१ वर्षांखालील गटात कुमिते प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. काता प्रकारात त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.अन्वेषाने १० वर्षे गटात कुमितेमध्ये सुवर्ण आणि काता प्रकारात रौप्य तसेच महिकाने ११ वर्षे गटात रौप्य पदक पटकविले. प्रशिक्षक विशाल डोंगरे यांच्या मागदर्शनात हे तिन्ही खेळाडू सराव करतात. खामल्यातील आॅटोचालक अरुण हाडके यांचा मुलगा असलेल्या कुणालने याआधी राष्टÑीय स्पर्धांमध्ये पदके मिळविली होती. तिन्ही खेळाडूंचे काल नागपुरात आगमन झाले. यावेळी रेल्वे स्थानकावर चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी उपस्थितीतांतर्फे सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अरुण हाडके, यशवंत वासनिक, धीरज हाडके, वैशाली गोस्वामी, तमाल बोस, विभा गजभिये, हरिदास व्यास, सुनील गर्ग, डॉ. सरिता माने, अनिता जनबादे, अनिता पाटील, पद्मा भिवगडे, रंजना रंगारी, डॉ. माया ब्राम्हणे, कविता हाडके आदी उपस्थित होते.
कराटेपटू कुणालची सुवर्णमय कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:07 IST
कराटेपटू कुणाल हाडके याने मलेशियातील आंतरराष्टÑीय ओपन कराटे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याच्या सहकारी खेळाडू अन्वेषा बोस आणि महिका गर्ग यांनीही पदकांची कमाई केली.
कराटेपटू कुणालची सुवर्णमय कामगिरी
ठळक मुद्देमलेशियातील आंतरराष्टÑीय स्पर्धेत जिंकली पदके