शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी, वाहन चोरी : अट्टल गुन्हेगार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 22:41 IST

नागरिकांचे दागिने हिसकावून नेणारा तसेच मोटरसायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार आकाश फुलचंद इरपाते (वय ३५) याच्या मुसक्या बांधण्यात बेलतरोडी पोलिसांनी यश मिळविले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने तसेच दुचाकीसह ६ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ठळक मुद्दे१० गुन्हे उघड, ६ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांचे दागिने हिसकावून नेणारा तसेच मोटरसायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार आकाश फुलचंद इरपाते (वय ३५) याच्या मुसक्या बांधण्यात बेलतरोडी पोलिसांनी यश मिळविले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने तसेच दुचाकीसह ६ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.कुख्यात इरपाते दिघोरीच्या रामकृष्ण नगरात राहतो. सकाळी, सायंकाळी फिरायला निघालेल्या महिला, पुरुषांचे दागिने हिसकावून घेण्यात आरोपी इरपाते सराईत आहे. सोनसाखळी चोरण्यासोबतच तो दुचाक्याही चोरतो. त्याने आतापर्यंत शहरातील विविध भागात अशाप्रकारचे १० गुन्हे केलेले आहेत. ११ ऑगस्टला सायंकाळी बेलतरोडीतील अनिता ज्ञानेश्वर झाडे या महिलेची सोनसाखळी आरोपीने चोरली होती. त्याची तक्रार मिळाल्यानंतर बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला. तब्बल १२ दिवसानंतर आरोपीच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांनी यश मिळविले. त्याच्याकडून या गुन्ह्याचा उलगडा करतानाच पोलिसांनी अन्य ९ गुन्ह्यांचा छडा लावला त्यात चार गुन्हे बेलतरोडीचे, बजाजनगरातील एक, लकडगंजमधील एक, हुडकेश्वरमधील दोन आणि नंदनवनमधील एक गुन्ह्याचा समावेश आहे. या गुन्ह्यातील ५ ठिकाणचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पाच हिरो होंडा स्प्लेंडर असा एकूण ६ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय आकोत, उपनिरीक्षक विकास मनपिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.आणखी गुन्हे उघड होणारआरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीArrestअटक