शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

सोन्याच्या बिस्कीटाने पोहचवले पोलीस कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:56 IST

धंतोलीच्या हॉटेलमध्ये थांबलेल्या तेलंगणामधील एका व्यक्तीजवळचे साडेनऊ लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेणा-या आरोपीला पोलीस कोठडीत जावे लागले.

ठळक मुद्देतेलंगणातील सल्लागाराला हादरा : हॉटेलच्या वेटरला पोलीस रिमांड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोलीच्या हॉटेलमध्ये थांबलेल्या तेलंगणामधील एका व्यक्तीजवळचे साडेनऊ लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेणा-या आरोपीला पोलीस कोठडीत जावे लागले. निखिल प्रमोद मेश्राम (वय ३०) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.गडचिरोलीतील गोकुळनगर-आशीर्वादनगरात राहणारा निखिल गेल्या काही महिन्यांपासून धंतोलीतील अवध रेस्टॉरेंटमध्ये वेटरचे काम करायचा. बाजुलाच अवध हॉटेल आहे. तो हॉटेलमध्ये खाद्य पदार्थ देण्याच्या निमित्ताने येत होता. तेलंगणातील खम्मम येथील एसआरसी टॉवरमध्ये राहणारे अमदुगला पाटी व्यंकटरमन (वय ५६) हे ज्योतिषी असल्याचा दावा करतात. ते वास्तुशास्त्राबाबतही सल्ला देतात. या व्यवसायाच्या निमित्ताने महिन्यातील १५ दिवस ते नागपुरातच राहतात. यावेळी ते धंतोलीतील अवध हॉटेलच्या २१४ क्रमांकाच्या रुममध्ये मुक्कामी होते. त्यांनी त्यांच्या मालकीचा खम्मम येथील भूखंड काही दिवसांपूर्वी विकला आणि त्यातून आलेली रक्कम घेऊन ते नागपुरात आले होते. त्यांनी येथे २५९ ग्राम सोन्याचे तीन बिस्कीट (डल्ला) ९ लाख, ६० हजारांत विकत घेतले. ते त्यांनी आपल्या रूममध्ये बॅगमध्ये ठेवले होते. २५ ते २७ आॅगस्टच्या दरम्यान संधी साधून निखिलने हे सोने लंपास केले. बुधवारी सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर व्यंकटरमन यांनी आधी हॉटेल प्रशासनाकडे तक्रार केली. नंतर धंतोली ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार विजय आकोत यांनी लगेच आपल्या सहका-यांना चोरीच्या शोधकामी लावले. हॉटेलमध्ये येणारा निखिल नामक वेटर गायब असल्याचा धागा चौकशीत मिळताच पोलिसांनी त्याचा पत्ता काढला अन् गुरुवारी सकाळी गडचिरोली गाठली. तेथे निखिल मेश्रामला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेल्या २५९ ग्राम सोन्यापैकी २४६ ग्राम सोने जप्त केले. त्याला अटक करून नागपुरात आणण्यात आले. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्याचा पोलिसांनी एक दिवसाचा पीसीआर मिळवला.पोलीस आयुक्तांकडून प्रशंसा !चोरलेल्या सोन्यापैकी १३ ग्राम सोने निखिलने त्याच्या एका मित्राकडे दिले. मला हे सोने सापडले. तुझ्याकडे ठेव, असे म्हणून निखिलने मित्राकडे सोने लपवून ठेवले. त्यामुळे पोलीस आता निखिलच्या त्या मित्राचा शोध घेत आहेत.दरम्यान, तक्रार मिळताच अवघ्या काही तासात या चोरीचा छडा लावून चोरीचा ऐवज जप्त करण्याची कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली धंतोलीचे ठाणेदार विजय आकोत यांच्या नेतृत्वात एएसआय प्रेमचंद तिवारी, हवलदार आसिफ शेख, विरेंद्र गुळरांधे, राजेंद्र खंडाते, दिनेश घुगे, पंकज हेडावू, हेमराज बेराळ, प्रमोद सोनवणे आणि देवेंद्र बोंडे यांनी ही कामगिरी बजावली. या कामगिरीची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दखल घेत तपास पथकाचे कौतुक केले आहे.

टॅग्स :GoldसोनंArrestअटक