शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

दररोज १०० किमी रस्ता बांधकामाचे लक्ष्य

By admin | Updated: October 25, 2015 02:45 IST

रस्ते विकासातून आपल्याला देशाचा विकास साधायचा आहे. यापूर्वी देशात दररोज तीन ते चार किलोमीटर रस्ता बांधल्या जात होता.

नितीन गडकरी : मनसर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजननागपूर : रस्ते विकासातून आपल्याला देशाचा विकास साधायचा आहे. यापूर्वी देशात दररोज तीन ते चार किलोमीटर रस्ता बांधल्या जात होता. आपल्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय आल्यानंतर या कामाची गती वाढवून प्रति दिवस १८ किमी पर्यंत आली आहे. लवकरच यात आणखी सुधारणा होऊन देशात दररोज किमान ३० किमीचा रस्ता तयार होईल. मात्र एवढ्यावर आपण थांबणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दररोज १०० किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे अंतर्गत लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्या दिशेने काम सुरू आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेपासून मनसरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन रामटेक टी- जंक्शनच्या जवळ मनसर येथे शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर होते. या वेळी गडकरी म्हणाले, आज भूमिपूजन होत असलेल्या याच मनसर खवासा मार्गावर आपला अपघात झाला होता. देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. यापैकी तीन लाख अपघातात हातपाय निकामी होतात तर दीड लाख मृत्यू होतात. रस्त्यांच्या बांधकामात राहणाऱ्या तांत्रिक चुका, केली जाणारी तडजोड या अपघातांसाठी जबाबदार असतात. त्यामुळे येत्या काळात महामार्गांची स्थिती सुधारून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण मंत्री झालो ते ३ लाख ८० हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे वन विभाग, पर्यावरण विभाग, रेल्वे विभाग आदींच्या मंजुरीसाठी अडली होती. यापैकी ३ लाख ४० हजार कोेटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. गडकरी म्हणाले, येत्या पाच वर्षात राष्ट्रीय महामार्गाची पाच लाख कोटींची कामे केली जातील. राष्ट्रीय महामार्ग हे पर्यावरणपूरक करण्यासाठी रस्त्याच्या प्रत्येक मंजूर कामाच्या निधीतून एक टक्का रक्कम राखून ठेवण्यात येईल. या निधीतून राष्ट्रीय महामार्ग बांधतांना वृक्षांचे पुनर्रोपण, नवीन वृक्षारोपण तसेच सौंदर्यकरण व देखभालीसाठी खर्च करण्यात येईल व यातून ग्रीन हायवे संकल्पना राबविण्यात येईल. महामार्गासाठी एक झाड तोडले तर पाच झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी घेतली जाईल असे सांगून आम्हीही पर्यावरणाप्रति संवेदनशील आहोत, असा टोला त्यांनी प्रकल्प अडविणाऱ्यांना लगावला. मनसर ते खवासा हा चौपदरी ४६ किलोमीटर मार्ग पर्यावरणाच्या रक्षणासोबत बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणारा ठरेल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यास त्यांना ताबडतोब वीज कनेक्शन देण्यात येईल, तसेच आदिवासी शेतकऱ्यांनी सोलर पंपाची मागणी केल्यास त्वरित पंप पुरविले जातील, असे सांगितले. (प्रतिनिधी)दुपदरी महामार्ग चौपदरी करणार : जावडेकर वनातून जाणाऱ्या महामार्गाच्या रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्ते घेण्यास वनविभागाच्या यापूर्वीच्या जाचक अटी रद्द करुन आता धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.यापुढे पर्यावरणाचे संतुलन व प्राण्यांच्या संरक्षणाचा विचार करून रस्त्यांचा विकास केला जाईल. ज्या ठिकाणी दोन पदरी राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या ठिकाणी चारपदरी राष्ट्रीय महामार्ग तयार केले जातील. यामुळे विकासाला चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. मनसर - खवासा महामार्गासाठी निधीसह सर्वकाही उपलब्ध होते. मात्र, वनखात्याची परवानगी मिळत नव्हती. आपण यातील अडथळे दूर केले व आता कामाला सुरुवात होत आहे. पर्यावरण विभागामुळे अडलेले रस्ते, जलवाहिनी, महापारेषणही वीज वाहिनी आदी सर्व कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगत हाच खरा विकासाचा मार्ग असल्याचे ते म्हणाले. निसर्गाचे संवर्धन व विकास या दोन्ही गोष्टींसाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.