शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कॅनडाला जाण्यासाठी आधी जावे लागते मालदीवला...प्रवासी, विद्यार्थी त्रस्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 10:20 IST

Nagpur News कॅनडा सरकारने भारतातील आरटी-पीसीआर टेस्ट रिपाेर्टच अमान्य करीत ही बंदी घातली आहे. प्रवाशांना टेस्ट रिपाेर्टसाठी दुसऱ्या देशाची चक्कर मारून, अवाढव्य खर्च करून कॅनडाचा प्रवास करावा लागताे.

ठळक मुद्देकॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरू व्हावी ‘वंदे भारत’ सेवाभारतीय आरटीपीसीआर अमान्य केल्याने मनस्ताप अवाढव्य खर्च करून करावा लागताे प्रवास

 

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कॅनडा सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांवर अनिश्चित काळासाठी निर्बंध घातले आहेत. कॅनडा सरकारने भारतातील आरटी-पीसीआर टेस्ट रिपाेर्टच अमान्य करीत ही बंदी घातली आहे. प्रवाशांना टेस्ट रिपाेर्टसाठी दुसऱ्या देशाची चक्कर मारून, अवाढव्य खर्च करून कॅनडाचा प्रवास करावा लागताे. त्यामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वंदे भारत’ सारखी सेवा सुरू करण्याची मागणी जाेर धरत आहे.   (Vande Bharat service)

यावर्षी एप्रिल महिन्यात भारतातून कॅनडाला गेलेल्या जवळपास सर्वच विमानांमधील अनेक प्रवासी आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपाेर्ट सादर करूनही काेराेना संक्रमित आढळून आले हाेते. अशाने कॅनडातील निर्बंधामुळे प्रवाशांना व विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून पुन्हा महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरसकट निर्बंध लादण्याऐवजी कॅनडा प्रशासनाने भारतातील काही रुग्णालयांची निवड करून त्यातील आरटी-पीसीआर रिपाेर्टचा स्वीकार करावा, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

सध्या अमिरात, लुफ्तान्सा आणि फ्रान्सच्या विमानांना कॅनडामध्ये आवागमनाची परवानगी आहे; मात्र भारतातून या देशातील विमानसेवेचा लाभ घेणे अडचणीचे आहे कारण त्यासाठी स्वतंत्र व्हिजा काढावा लागताे. केवळ मालदीव असा देश आहे, जिथे व्हिजा न घेता जाऊन कॅनडाकडे प्रवास करता येताे. त्यामुळे ज्या भारतीयांनी कॅनडा प्रवासाचे नियाेजन केले आहे त्यांना आधी मालदीव गाठावे लागते. तेथून ते कॅनडाकडे प्रवास करतात. मात्र, हा प्रवास अतिशय महागडा ठरताे. कारण त्यांना आधी मालदीवला जाऊन आरटी-पीसीआर टेस्ट करण्यासाठी दाेन-तीन दिवस मुक्काम करावा लागताे आणि त्यानंतरच निगेटिव्ह असल्याचा रिपाेर्ट घेऊन कॅनडाकडे रवाना हाेता येते. हा इतका ससेमिरा आतापर्यंत अनेक भारतीयांना करावा सुद्धा लागला आहे.

विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास न परवडणारा ठरला आहे. पूर्वी भारतातून कॅनडाला थेट जाण्यासाठी ७५,००० रुपये खर्च येत हाेता. मात्र सध्या अशाप्रकारे ससेमिरा करून २.१५ ते २.३० लाख रुपये खर्च करावे लागत असून हा एकाच बाजूचा प्रवास आवाक्याच्या बाहेर जात आहे. कॅनडात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असा प्रवास करीत जाणे म्हणजे पालकांच्या खिशाला भगदाड पाडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे ‘वंदे भारत’सारख्या सेवेचे नियाेजन करून काेराेना टेस्ट निगेटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट प्रत्यार्पणासाठी एअर इंडिया व एअर कॅनडामध्ये समन्वय स्थापित करणे आवश्यक असल्याचे सुचविले जात आहे.

त्रयस्थ देशात १४ दिवस क्वारंटाईनची अट

- कॅनडाच्या अधिकृत वेबसाईटनुसार एखादा प्रवासी ट्रान्झिट देशात काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आल्यास त्याला त्रयस्थ देशात १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. त्यामुळे साहजिकच त्या प्रवाशाला क्वारंटाईन काळादरम्यान माेठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागेल; मात्र नकारात्मक चाचणी अहवाल असल्यास दाेन-तीन दिवसात त्यांना देश साेडता येईल.

भारताने कॅनडा सरकारशी चर्चा करावी

- भारतीय विद्यार्थी तसेच सामान्य प्रवाशांचाही विचार करीत केंद्र सरकारने हा विषय गंभीरतेने घेत कॅनडा सरकारशी बाेलून या समस्येतून लवकरात लवकर मार्ग काढण्याची गरज आहे, अशी भावना बहुतेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे. ही भावना देशातील अनेक ट्रॅव्हल एजन्सीची सुद्धा आहे. त्यांनाही दरराेज मनस्ताप सहन करणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या निराशेचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी