शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नागपुरात गो एअरच्या विमानात बिघाड, दिल्ली विमान रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 11:50 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या दिवशीही गो एअरचे विमान दुरुस्त झाले नाही. त्यामुळे सोमवारी जी ८-२५२० नागपूर दिल्ली विमान रद्द करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या दिवशीही गो एअरचे विमान दुरुस्त झाले नाही. त्यामुळे सोमवारी जी ८-२५२० नागपूर दिल्ली विमान रद्द करण्यात आले.रविवारी रात्री या विमानात बिघाड झाल्यामुळे बंगळुरूवरून आलेल्या विमानात दिल्लीच्या प्रवाशांना पाठविण्यात आले. परंतु हे विमान दिल्लीतच अडकले. नागपुरात आधीच नादुरुस्त झालेल्या विमानाला रविवारी सकाळी ६ ऐवजी ९.३० वाजता बंगळुरूला रवाना करण्यात येणार होते. परंतु विमान सकाळी ११ वाजता रन वे पर्यंतच पोहोचू शकले. त्यानंतर अहमदाबादवरून पोहोचलेल्या विमानातून प्रवाशांना बंगळुरूला पाठविण्यात आले. एक विमान नादुरुस्त असल्यामुळे विमानांचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. याशिवाय सोमवारी गो एअरचे नागपूर-पुणे विमानही रात्री उशिरापर्यंत रवाना झाले नव्हते. फ्लाईट जी ८-२८४ नागपूर-पुणेच्या प्रस्थानाची वेळ रात्री १२.१५ वाजता सांगण्यात आली. जी ८-१४२ मुंबई-नागपूर हे विमान उशिरा आल्यामुळे नागपूर-पुणे विमानाला उशीर झाला.धुक्यामुळे सहा विमानांना उशीरकडाक्याची थंडी आणि दाट धुके पडल्यामुळे विमान सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. सोमवारी खराब वातावरणामुळे सहा विमानांना उशीर झाला. सोमवारी उशीर झालेल्या विमानात जी ८-६१५ दिल्ली-नागपूर १.२१ तास, जी ८-७३१ अहमदाबाद-नागपूर १.१० तास, ६ ई ५३८८ मुंबई-नागपूर ४१ मिनिट, ६ ई ४०३ मुंबई-नागपूर ५५ मिनिट, ६ ई २०२ पुणे-कोलकाता ४९ मिनिट आणि जी ८-१४२ मुंबई-नागपूर २.२० तास उशिराने पोहोचले. विमानांना विलंब झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

 

टॅग्स :GoAirगो-एअरDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर