शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

‘ग्लोबल नागपूर समीट’ २१ पासून

By admin | Updated: November 19, 2015 03:29 IST

वर्ष २०२० पर्यंत नागपूरला जागतिक शहर बनविण्याच्या उद्देशांतर्गत ‘नागपूर फर्स्ट’ संस्थेच्या वतीने २१ आणि २२ नोव्हेंबरला ‘ग्लोबल नागपूर समीट-२०१५’...

‘नागपूर फर्स्ट’ संस्थेचे आयोजन : लोकमत मीडिया पार्टनरनागपूर : वर्ष २०२० पर्यंत नागपूरला जागतिक शहर बनविण्याच्या उद्देशांतर्गत ‘नागपूर फर्स्ट’ संस्थेच्या वतीने २१ आणि २२ नोव्हेंबरला ‘ग्लोबल नागपूर समीट-२०१५’ (जीएनएस) चे आयोजन पर्सिस्टंट सिस्टिम्स आयटी पार्कच्या सभागृहात करण्यात येणार आहे. लोकमत मीडिया पार्टनर आहे. मान्यवरांची उपस्थितीनागपूर फर्स्टचे अध्यक्ष दिनेश जैन यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, ‘जीएनएस’च्या पहिल्या दिवशी २० प्रमुख वक्ते नागपूरला स्मार्ट सिटी बनविणे, शहराच्या विकासात आंतरराष्ट्रीय सहयोग आणि जागतिक स्तरावर नागपूरच्या विकासाच्या मुद्यांवर मार्गदर्शन करतील. प्रमुख वक्त्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, सिस्टर सिटीज इंटरनॅशनलचे चेअरमन बिल बोएरम, फाऊंडेशन फॉर फ्युचरिस्टिकचे संस्थापक अध्यक्ष करुणा गोपाल, ब्रिटिश दूतावासाचे (मुंबई) उपउच्चायुक्त कुमार अय्यर, मुंबईतील आॅस्ट्रेलियन दूतवासाचे मार्क पियर्स, इंडो-कॅनडा इम्पॅक्ट सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नेमी बांठिया, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा समावेश आहे.उद्योजकांना पुरस्कार देणार नागपूर फर्स्ट अवॉर्ड समितीेचे अध्यक्ष हेमंत लोढा यांनी सांगितले की, २१ नोव्हेंबरला सायंकाळी १४ वर्गवारीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागपूर आणि जागतिकस्तरावरील उद्योजकांना पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रम रॅडिसन ब्ल्यू हॉटेल, वर्धा रोड येथे होणार आहे. पुरस्कारासाठी ८० नावे आली आहेत. स्थानिक आणि जागतिकस्तरावरील उद्योजकांना प्रोत्साहित करून नागपूरला ग्लोबल सिटीमध्ये सहभागी करून देण्याचा उद्देश आहे. विविध विषयांवर चर्चासत्रनागपूर : २२ नोव्हेंबरला रिटेल सप्लाई चेन, लॉजिस्टिक्स, डिफेन्स, एअरोस्पेस, हेल्थकेअर, वैद्यकीय पर्यटन या विषयांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डिक्की स्कील अ‍ॅण्ड ईडीपी सेक्टर कौन्सिलचे अध्यक्ष अरुण खोब्रागडे, क्राऊडएराचे संस्थापक चेत जैन, निको डिफेन्स सिस्टिम्सचे संचालक डी.पी. सरमा, इंडिया साऊथ अफ्रिका अ‍ॅण्ड मध्यपूर्व, केल्डेरिसचे व्यवस्थापकीय संचालक हकीमुद्दीन अली, यूकेच्या न्यू क्रॉस हॉस्पिटलचे सल्लागार कार्डिओलॉजिस्ट व इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉ. संजीव पेटकर, केपीएमजी इंडियाचे पार्टनर व नॅशनल हेड उत्कर्ष पालनिटकर, यूकेचे सल्लागार शोल्डर डॉ. विशाल साहनी, स्वीडन दूतावासाचे फ्रेड्रिका ओर्नब्रेन्ट, ब्रिटिश दूतवास वेस्ट इंडियाचे संचालक शेरॉन मेमीस, पेप्सीकोचे उपाध्यक्ष सत्यव्रत पेंढारकर आदी वक्ते मार्गदर्शन करतील. पत्रपरिषदेत ‘नागपूर फर्स्ट’चे सचिव फैज वाहिद, सदस्य हकीमुद्दीन अली, संजय अरोरा, रेडीसन ब्लू हॉटेलचे महाव्यवस्थापक मनोज बाली, एन्सारा मेट्रो पार्कच्या महाव्यवस्थापक वंदना रघुवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)