शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे पावडर दिल्याने चिमुकल्याचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 16:00 IST

डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषध न देता चुकीचे औषध दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. या संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मेडिकल चौकातील शुभम् मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करीत १५ हजार रुपयांचे तडजोड शुल्क आकारले. परंतु हा दंड कमी असल्याने तक्रारकर्ता ग्राहक न्यायलयात दाद मागण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देएफडीएने केली कारवाई : शुभम् मेडिकल स्टोअर्सकडून वसूल केले तडजोड शुल्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषध न देता चुकीचे औषध दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. या संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मेडिकल चौकातील शुभम् मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करीत १५ हजार रुपयांचे तडजोड शुल्क आकारले. परंतु हा दंड कमी असल्याने तक्रारकर्ता ग्राहक न्यायलयात दाद मागण्याच्या तयारीत आहे.प्राप्त तक्रारीनुसार, मुंबई येथील एक कुटुंब नागपुरात माहेरी आले. नऊ महिन्याचा वेंदातही सोबत होता. वेदांतची प्रकृती अचानक बिघडल्याने नातेवाईक त्याला मेडिकल चौकातील एका खासगी बालरोग डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी बालकाला तपासून प्रिस्क्रप्शनवर औषधे लिहून दिली. यात औषधांसोबतच ‘इसम पावडर’चाही समावेश होता. रुग्णाच्या आईने मेडिकल चौकातीलच शुमम् मेडिकल स्टोअर्समधून औषधे खरेदी केली. परंतु स्टोअर्समधील मुलाने ‘इसम पावडर’ ऐवजी मोठ्यांना दिली जाणारी ‘एन्शुअर पावडर’ दिली. रुग्णाला औषधांसोबतच ही पावडरही देण्यात आली. परंतु या पावडरमुळे बालकाची प्रकृती आणखीनच ढासळली. तातडीने त्याच डॉक्टरला दाखविले. डॉक्टराने लिहून दिलेल्या व विकत घेतलेल्या औषधाची शहनिशा केल्यावर औषध विक्रेत्याने चुकीची पावडर दिल्याचे समोर आले. तब्बल ३६ तासानंतर बालकाची प्रकृती धोक्याबाहेर आली. रुग्णाच्या नातेवाईकांनी शुभम् मेडिकल स्टोअर्सकडे याबाबत जाब विचारला असता तेथील काम करणाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. १९ मार्च रोजी नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे या विषयी तक्रार केली. मात्र तब्बल १९ दिवसानंतर ही तक्रार औषधांशी संबंधित नसून अन्न प्रशासनाशी संबंधित असल्याने अन्न प्रशासनाकडे पाठविण्यात आली. परंतु या विभागाकडूनही कारवाई होत नसल्याने अखेर मुख्यमंत्र्यांकडे या विषयी तक्रार करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशी होताच कारवाईची सूत्रे हलली आणि अन्न प्रशासनाने शुभम् मेडिकल स्टोअर्सवर नियमानुसार १५ हजाराचा तडजोड शुल्क आकारले. परंतु बालकाचा धोक्यात आलेला जीव पाहता, त्या तुलनेत जास्तीचा दंड किंवा कठोर शिक्षा रुग्णांच्या नातेवाईकांना अपेक्षित होती. यामुळे या प्रकरणाला घेऊन नातेवाईक आता ग्राहक न्यायालयात दाद मागणार आहे.

१५ हजार रुपयांचे तडजोड शुल्कमेडिकल चौकातील शुभम् मेडिकल स्टोअर्स संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची शहनिशा करण्यात आली. ‘इसम पावडर’ ऐवजी मोठ्यांना दिले जाणारे ‘एन्शुअर पावडर’ देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. या सारख्या घटनेमध्ये जास्तीत जास्त २५ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्याचे अधिकार आहेत. परंतु स्टोअर्सधारक नोंदणीधारक असल्याने व गुन्ह्याचे स्वरूप पाहता १५ हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले.-मिलिंद देशपांडेसहायक आयुक्त, अन्न प्रशासन, नागपूर शहर

 

टॅग्स :medicineऔषधंHealthआरोग्य