शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे देहदान करून समाजासमोर ठेवला आदर्श

By admin | Updated: June 7, 2017 01:59 IST

मी, माझे घर, माझे कुटुंब या मर्यादित त्रिकोणात आयुष्य जगणाऱ्या आजच्या व्यवहारी जगात एका व्यक्तीने स्वत:सह

तेरवीही नाकारली : आतापर्यंत कुटुंबातील तीन आप्तांचे मृतदेह मेडिकलला सोपवले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मी, माझे घर, माझे कुटुंब या मर्यादित त्रिकोणात आयुष्य जगणाऱ्या आजच्या व्यवहारी जगात एका व्यक्तीने स्वत:सह आपल्या कुटुंबीयांच्या देहदानाचा संकल्प केला. नुसता संकल्पच केला नाही तर एका मागून एक असे तीन जीव मृत्यूने हिरावले असतानाही भावना आवरून हा संकल्प पूर्णत्वास नेला. देहदानाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून सांगत समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे मदन नागपुरे. मदन नागपुरे हे महानगरपालिकेत नोकरीवर आहेत; सोबतच ते एका साप्ताहिकाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीतही सक्रिय आहेत. आपल्या देशात आजही जन्म-मत्यूच्याबाबतीत अनेक धार्मिक समजुती आहेत. एखाद्याचा मृत्यू झाला तर जोपर्यंत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही, या मान्यतेतून एक तर मृतदेहाला अग्नीच्या स्वाधीन केले जाते नाही तर मातीच्या सुपूर्द केले जाते. परंतु याच मृतदेहाचा उपयोग पुढचे अनेक आयुष्य वेळेपूर्वी संपण्याआधी वाचवले जाऊ शकते, असा विचार कुणी करीत नाही. तो विचार समाजात रुजावा, वाढावा यासाठी मदन नागपुरे धडपडत आहेत. याची सुरुवात त्यांनी स्वत:च्या घरापासून केली. २००० साली त्यांची मोठी आई गेली. तेव्हा सर्वप्रथम त्यांनी त्यांचे देहदान केले. २०१६ ला आई गेली. तिचेही देहदान केले. नुकतेच ५ जून रोजी त्यांची पत्नी लता नागपुरे मरण पावल्या. विशेष म्हणजे, ६ जूनला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच्या नेमक्या एक दिवसाआधी पत्नी किडनीच्या आजाराने गेली. ३० वर्षांचा सहप्रवास अर्ध्यावर सोडून गेली. मदन नागपुरे यांनी या डोंगराएवढ्या दु:खातही आपल्या संकल्पानुसार पत्नीचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाला सोपवला. सर्व कर्मकांड नाकारून जुन्या कपड्यावरच पत्नीला अखेरचा निरोप दिला. तेरवीच्या नावावर पैशांची उधळपट्टीही त्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी मृत्यूनंतरचे सोपस्कारही नाकारले. शरीराला जाळण्या वा पुरण्यापेक्षा वैद्यकीय संशोधनासाठी देणे हा खरा माणुसकीचा धर्म आहे. परंतु या विषयावर नुसता उपदेश करून उपयोग नाही. देहदानाचा विचार आधी कृतीत उतरला पाहिजे म्हणूनच मी याची सुरुवात स्वत:च्या घरापासून केली. २०१५ साली मी व माझ्या ४७ सहकाऱ्यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. देहदानाची ही चळवळ जनचळवळ व्हावी, अशी माझी इच्छा आहे. - मदन नागपुरे