शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश द्या; प्रवासी संघटनेची मागणी

By नरेश डोंगरे | Updated: April 9, 2024 19:18 IST

प्रत्येक कोचमध्ये गार्ड नेमा, प्रवासी संघटनेची मागणी : रेल्वे बोर्ड, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश द्या आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक कोचमध्ये नियुक्त करा, अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे बोर्डाच्या दिल्लीतील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अलिकडे नागपूर स्थानकावरून विविध मार्गावर धावणाऱ्या वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी प्रचंड गर्दी करीत आहेत. खास करून राप्ती सागर एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम, गोरखपूर एक्सप्रेस, हैदराबाद, हावडा, मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, जयपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आधीच पाय ठेवायला जागा नसताना प्रवासी त्यात बसण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. या संबंधाने दोन दिवसांपूर्वी 'लोकमत'ने सचित्र वृत्तही प्रकाशित केले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसह रेल्वे बोर्डाच्या शिर्षस्थांना पत्र लिहून त्यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. पत्रातून त्यांनी म्हटले आहे की, रेल्वे गाडीची प्रवासी क्षमता पूर्ण झाल्यानंतर त्यात गाडीत कोणताही अतिरिक्त प्रवासी चढू नये, यासाठी ड्युटीवर असलेल्या टीटीई तसेच स्टेशन स्टाफला तिकिट बनवू नये, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र, उत्पन्नाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सामान्य श्रेणीच्या प्रवाशांना स्लिपरचे तिकिट देऊन त्यांना स्लिपर कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येते. परिणामी त्या कोचमध्ये अतिरिक्त गर्दी होते. त्याचा फटका आरक्षण करून कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो. त्यांना अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा त्रास होतो.

कुठेच जागा नसल्याने ही मंडळी टॉयलेटजवळ बसतात. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची तीव्र कुचंबना होते. हे सर्व टाळण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश देण्याची आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक कोचमध्ये नेमण्याची मागणी शुक्ला यांनी या पत्रातून केली आहे.दखल घेणार का ?प्रवासी संघटनेकडून करण्यात आलेल्या या मागणीची रेल्वे बोर्ड किंवा मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडून किती तत्परतेने आणि कशा प्रकारे दखल घेतली जाते, त्याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे