शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला ५०० कोटीचे विशेष अनुदान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 20:33 IST

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायालाही फटका बसला. याचा परिणाम महापालिकेच्या करवसुलीवर झाला आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारकडे ५०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देराज्य सरकारकडे स्थायी समिती अध्यक्षांची मागणीकोरोनामुळे करवसुलीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायालाही फटका बसला. याचा परिणाम महापालिकेच्या करवसुलीवर झाला आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारकडे ५०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी गुरुवारी दिली.महापालिकेची यंत्रणा कोरोना नियंत्रण व उपाययोजनात व्यस्त असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत मनपाचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, बाजार, नगररचना व अन्य विभागाचे उत्पन्न घटले आहे. त्यातच शासन अनुदानातही घट झाली आहे. याचा परिणाम शहरातील विकास कामांवर झाला आहे.मनपाला दर महिन्याला ११५ कोटींचा खर्च करावा लागतो. कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन, वीज बिल, कच्चे पाणी आदींचा यात समावेश आहे.उत्पन्न व आवश्यक खर्च विचारात घेता फारसा निधी शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत निधी उपलब्ध होत नसल्याने शहरातील विकास कामांवर याचा परिणाम होत आहे. सुरू असलेली विकास कामे व प्रस्तावित अत्यावश्यक विकासकामासाठी निधीची गरज आहे.बजेट ऑक्टोबरमध्येमनपाचे वर्ष २०२०-२१ या वर्षाचे बजेट सप्टेंबर महिन्यात मांडले जाणार होते. परंतु मनपाची यंत्रणा कोरोना नियंत्रणात व्यस्त असल्याने व तांत्रिक अडचणीमुळे ३० तारखेपर्यंत बजेट सादर होण्याची शक्यता नाही. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात बजेट सादर केले जाणार आहे. सभागृहात बजेट सादर केल्यानंतर आयुक्तांची मंजुरी आवश्यक असते. यात ऑक्टोबर महिना जाणार आहे. म्हणजेच स्थायी समितीचे बजेट नोव्हेंबरपासून अमलात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी