शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

छायाचित्रकारितेला व्यावसायिक स्वरूप द्या

By admin | Updated: August 22, 2016 02:39 IST

येणाऱ्या काळात छायाचित्रकारितेला व्यावसायिक स्वरूप द्या असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नितीन गडकरी : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत छायाचित्र स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरणनागपूर : येणाऱ्या काळात छायाचित्रकारितेला व्यावसायिक स्वरूप द्या असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.जागतिक छायाचित्रण दिवसानिमित्त आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबतर्फे आयोजित छायाचित्र स्पर्धेचे पुरस्कार रविवारी वितरित करण्यात आले. त्याप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे हा कार्यक्रम झाला. मनपा सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, माही समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तुषार रावल व अजंठा समूहाचे हरीश पटेल हे प्रमुख अतिथी म्हणून तर, क्लबचे अध्यक्ष चेतन जोशी, सचिव राजन गुप्ता व स्पर्धेचे समन्वयक विनोद खापेकर व्यासपीठावर उपस्थित होते. ही २१ वी स्पर्धा होती. स्पर्धेतील छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. अनेक देशांतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर छायाचित्रे विक्रीसाठी ठेवलेली असतात. हा प्रयोग नागपुरातही केला जाऊ शकतो. नागपुरात विमानतळ आहे. मेट्रो रेल्वेचे काम प्रगतिपथावर आहे. केंद्र शासन आता बस पोर्ट तयार करणार आहे. छायाचित्रकारांनी व्यावसायिक होऊन या गोष्टींचा फायदा घ्यायला हवा असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. त्यांनी स्पर्धेतील छायाचित्रांची प्रशंसा केली. जीवनात वाईट गोष्टी भरपूर तर, चांगल्या गोष्टी कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगल्या गोष्टींना वाढविण्याचे कार्य केले पाहिजे असे मत तिवारी यांनी व्यक्त केले. व्यक्तीने कशाचाही अभिमान बाळगू नये. जीवन नम्रपणे जगावे असे रावल यांनी तर, व्यक्तीने स्वत:सह समाजाचेही भले केले पाहिजे असे पटेल यांनी सांगितले.(प्रतिनिधी)पुढचा विषय ‘स्वच्छ भारत’पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेचा विषय ‘स्वच्छ भारत’ ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यामार्फत हा विषय जाहीर करण्यात आला. हा विषय व्यावसायिक गटातील छायाचित्रकारांसाठी आहे. हौशी गटातील छायाचित्रकारांसाठी खुली स्पर्धा आहे. यावर्षीचा विषय ‘लॅन्डस्केप’ होता.पुरस्कार विजेते स्पर्धकव्यावसायिक गट : प्रथम - अमोल शिरभाते, द्वितीय - मंगेश तोडकर, तृतीय - मनोज बिंड, प्रोत्साहनपर पुरस्कार - पंकज गुप्ता, संदीप वाघ, सुनीत प्रधान, योगेश वाघेला, रमाकांत सारवा, ओसीपीसी ज्युरी पुरस्कार - सुनील इंदाने, एम. व्यास, अरुण कुलकर्णी.हौशी गट : प्रथम - पी. लोणारे, द्वितीय - वेग चरडे, तृतीय - प्रणाली सालोडकर, प्रोत्साहनपर पुरस्कार - आराध्या गुप्ता, विवेककुमार, आयुष अग्रवाल, संचिता कमानी, हर्षद धापा, ओसीपीसी ज्युरी पुरस्कार - अमेया मराठे.