अखिल भारतीय परधान समाज कृती समितीनागपूर : परधान जमात ही गोंडियन संस्कृतीची प्रचारक व निर्मिती असून परधान जमातीला आदिम जमातीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय परधान समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य चंद्रपूर जिल्हा शाखेच्यावतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पोलिसांनी मॉरिस कॉलेज येथे हा मोर्चा अडविला. मोर्चात सहभागी परधान जमातीच्या बांधवांनी जोरदार नारेबाजी करून शासन दरबारी आपल्या मागण्या रेटून धरल्या. नेतृत्व : एकनाथ कन्नाके, के. पी. प्रधानमागण्या : परधान जमातीला ९ सप्टेबर २०१५ च्या मानवशास्त्रीय अभ्यास योजनेतून वगळण्यात यावेपरधान जमात ही गोंडियन संस्कृतीची प्रचारक व निर्मिती आहे, त्यामुळे परधान जमातीला आदिम जमातीचा दर्जा द्यावाआदिवासी परधान जमातीच्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी बार्टी योजनासारख्या योजना निर्माण करून प्रशिक्षण द्यावेबोगस आदिवासींना संरक्षण देणारा २१ आॅक्टोबर २०१५ चा शासन निर्णय तात्काळ रद्द करावाराज्य घटनेच्या ३४२ अनुच्छेदात नमूद आदिवासी जमात ठरविण्याच्या प्रक्रियेत घटनाबाह्यरीत्या नव्याने बदल करण्यात येऊ नयेपरधान जमातीवर षड्यंत्र करणारे आयुक्त संभाजी सरकुंडे यांची कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी
परधान जमातीला आदिम जमातीचा दर्जा द्या
By admin | Updated: December 16, 2015 03:31 IST