आॅनलाईन लोकमतनागपूर : ठाणे जिल्ह्यातील साईनाथवाडी येथून रेल्वेचा मुंबई ते नवी दिल्ली असा डेडीकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्प प्रस्थापित आहे. या प्रकल्पामुळे साईनाथवाडी व साईनाथनगर झोपडपट्टीतील ३०० ते ४०० घर बाधित होणार आहे. ४० वर्षांपासून ही झोपडपट्टी वसलेली आहे. प्रकल्पात जी घरे जाणार आहे, त्याच्या पुनर्वसनासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु कुठलाही तोडगा निघालेला नाही. घराच्या मोबदल्यात घर मिळावे, अशी मागणी घेऊन साईनाथवाडीतील नागरिकांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. मोर्चाचे नेतृत्व अविनाश मोरे, भुजंग कांबळे, गोरख वाघमारे, जयश्री चव्हाण, मल्लिकार्जुन केरी आदींनी केले.
घराच्या मोबदल्यात घर द्या :साईनाथवाडी झोपडपट्टी महासंघाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:58 IST
ठाणे जिल्ह्यातील साईनाथवाडी येथून रेल्वेचा मुंबई ते नवी दिल्ली असा डेडीकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्प प्रस्थापित आहे. या प्रकल्पामुळे साईनाथवाडी व साईनाथनगर झोपडपट्टीतील ३०० ते ४०० घर बाधित होणार आहे.
घराच्या मोबदल्यात घर द्या :साईनाथवाडी झोपडपट्टी महासंघाचा मोर्चा
ठळक मुद्देरेल्वे प्रकल्पात ३०० ते ४०० घर बाधित होणार