शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट द्या, अन्यथा मोटरसायकलींची नोंदणी बंद : हायकोर्टाचा उत्पादकांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:16 IST

ग्राहकांना मोटरसायकल खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट देण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी उत्पादक कंपन्यांना दिला.

ठळक मुद्देपरिवहन आयुक्त करतील कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ग्राहकांना मोटरसायकल खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट देण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी उत्पादक कंपन्यांना दिला. तसेच, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांच्या मोटरसायकलींची नोंदणी बंद करण्यात यावी, असे राज्य परिवहन आयुक्तांना सांगितले.यासंदर्भात सौरभ भारद्वाज व मनीषसिंग चव्हाण यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला न्यायालयाने ताजश्री मोटर्स, सुदर्शन मोटर्स, ऋषिकेश मोटर्स, अरुण मोटर्स, नांगिया मोटर्स, केटीएम मोटर्स, कुसुमगर मोटर्स, पॅरागॉन ट्रॅड, ए. के. गांधी मोटर्स, मस्कट मोटर्स, युनिव्हर्सल मोटर्स, जयका टीव्हीएस, उन्नती हिरो, हिरो मोटर्स, इंद्रायणी मोटर्स, पाटणी मोटर्स व अद्विद आॅटोमोबाईल्स या १७ मोटरसायकल डीलर्सना समन्स बजावून १२ फेब्रुवारी रोजी व्यक्तिश: हजर होण्याचा आदेश दिला होता. तसेच, मोटरसायकल खरेदी केल्यानंतर ग्राहकांना दोन हेल्मेट का देण्यात येत नाही, अशी विचारणा केली होती. त्यानुसार मोटरसायकल डीलर्सनी न्यायालयात हजर होऊन संयुक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले व डीलर्सना उत्पादक कंपन्यांकडूनच हेल्मेट पुरविले जात नसल्याचे स्पष्टीकरण दिले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने उत्पादक कंपन्यांना नियमांचे पालन करण्यास सांगावे, असे निर्देश परिवहन आयुक्तांना दिले व यावर सहा आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच, नियमाचे उल्लंघन करणाºया उत्पादकांच्या मोटरसायकलींची नोंदणी बंद करावी असा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अवधेश केसरी, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.असा आहे नियमकेंद्रीय मोटर वाहन नियम-१९८९ मधील नियम १३८(४)(एफ) अनुसार उत्पादकांनी ग्राहकांना मोटरसायकल खरेदी केल्यानंतर त्यासोबत दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. परंतु, या नियमाचे पालन केले जात नाही. ग्राहकांना मोटरसायकल खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट दिले जात नाहीत. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRto officeआरटीओ ऑफीस