शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

एक सिलेंडर धारकांना चार लिटर केरोसीन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:58 IST

अन्न सुरक्षा अधिनियमानुसार प्रती व्यक्ती ५ किलो धान्य (एक कुटुंब) ३५ किलो धान्य, साखर, गोडेतेल, डाळ व एक सिलेंडर धारकांना चार लिटर केरोसीन देऊन अन्नधान्य वितरण विभागाने १ आॅगस्ट २०१८ च्या शासन परिपत्रकात शिथिलता आणावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. प्रकाश गजभिये यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांना रविभवन येथे भेटून निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्दे प्रकाश गजभिये यांची गिरीश बापट यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न सुरक्षा अधिनियमानुसार प्रती व्यक्ती ५ किलो धान्य (एक कुटुंब) ३५ किलो धान्य, साखर, गोडेतेल, डाळ व एक सिलेंडर धारकांना चार लिटर केरोसीन देऊन अन्नधान्य वितरण विभागाने १ आॅगस्ट २०१८ च्या शासन परिपत्रकात शिथिलता आणावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. प्रकाश गजभिये यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांना रविभवन येथे भेटून निवेदनाद्वारे केली.राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात बी.पी.एल.,ए.पी.एल.व अंत्योदय कार्ड धारकांना दरमहा १० लिटर केरोसिन वितरित केले जात होते तर एक सिलेंडरधारकांना सुद्धा चार लिटर केरोसीन देण्यात येत होते. मात्र २०१४ साली भाजप-शिवसेना सरकार आल्यावर हे बंद करण्यात आले, हा राज्यातील जनतेवर घोर अन्यायच आहे. गोरगरीब जनता घरचे सिलेंडर संपल्यावर केरोसिनचा उपयोग सुध्दा करतात, मात्र १ आॅगस्ट २०१८ च्या शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने बी.पी.एल.,ए.पी.एल.व अंत्योदय कार्ड धारकांकडून त्यांच्याकडे सिलेंडर नसल्याचे लिखित हमीपत्र भरून घेण्याची मोहीम राबविण्यात आली. ते हमीपत्र केरोसीन परवानाधारकांनी भरून घ्यावयाचे आहे. हा एकप्रकारे गोरगरीब जनतेवर आणि केरोसीन परवानाधारकांवर अन्यायच आहे. शासनाच्या परिपत्रकात केरोसीन परवानाधारकाने हमीपत्राची कामे करावी,असे कुठेच नमुद नाही, मात्र पुरवठा अधिकारी कार्डधारकांकडून गॅस सिलेंडर नसणेबाबत हमीपत्र भरून घेण्याचे काम करण्याकरिता केरोसीन परवानाधारकांवर प्रचंड दबाव टाकत असल्याकडे गजभिये यांनी बापट यांचे लक्ष वेधले.नागपूर शहरातील सर्व केरोसीन परवानाधारक व हॉकर्स यांना पुरवठा विभागाने सप्टेंबर २०१८ या महिन्यापासून अजूनपर्यंत केरोसीनचा कोटा वाटपाकरिता दिलेला नसल्याने नागपूरकरांना केरोसीनपासून वंचित रहावे लागत आहे.यावेळी अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शोएब असद, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, संजय पाटील, विजय गजभिये, अजय चौरे , सुधाकर जिचकार, मिलिंद सोनटक्के, मोहम्मद सलीम, रत्नमाला मेश्राम, लक्ष्मी शिंगाडे, पार्वता लोखंडे, आशा अंडरसहारे, श्रीधर खापर्डे, कपिल सोमकुंवर, नितेश वंजारी, पराग बोरकर, पुरूषोत्तम बडगे, बाळू बिहारे, रितेश अग्रवाल, अशोक मेश्राम, राजू मेश्राम, अरूण तिडके,सुरेश चव्हाण, रामभाऊ डोंगरे, राजेश गावळी, सतीश वासनिक, देवराव जांभुलकर, विजय इंगळे, कृष्णा राऊत, भगवान पाटील, कविता पाटील, बबलू वानखेडे, कपिल सोनकुसरे, आनंद नारनवरे, हेमंत गावंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Gajbhiyeप्रकाश गजभियेgirish bapatगिरीष बापट