शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:05 IST

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथजोगी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाथजोगी, नाथपंथी, डवरी गोसावी, भराडी समाजाच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देनाथजोगी समाजाचा हल्लाबोल मोर्चा : हातात काळे झेंडे घेऊन शासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथजोगी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाथजोगी, नाथपंथी, डवरी गोसावी, भराडी समाजाच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.यशवंत स्टेडियम येथून नाथजोगी समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा विधानभवनाकडे जात असताना मॉरिस टी पॉईंट येथे पोलिसांनी हा मोर्चा अडविला. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चात सहभागी हजारो नाथजोगी बांधवांनी जोरदार नारेबाजी करीत आपल्या मागण्या रेटून धरल्या. ‘आरोपीला फाशी झालीच पाहिजे,’, ‘समाजाला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘भटक्याला न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला. धुळे हत्याकांड निषेध असे लिहिलेले काळे झेंडे हातात घेऊन नाथजोगी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. समाजातील नागरिकांना भटकंतीमुळे १९६१ चा वास्तव्याचा पुरावा मिळत नसल्यामुळे जातीचे दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्रे मिळत नाहीत. समाजाकडे स्थायी स्वरुपाचा उद्योग, पक्की घरे, शेती नसून भटकंतीमुळे मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या हितासाठी शासनाने कॅम्पद्वारे जातीचे दाखले देण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. दरम्यान शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांनी मोर्चाला भेट देऊन आपले समर्थन दिले. मोर्चातील अनिल रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्यारेलाल शिंदे, रवींद्र चव्हाण, शेगर महाराज, भाऊलाल बाबर यांच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. तर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मोर्चास्थळी भेट देऊन नाथजोगी समाजाच्या मागण्यांवर कारवाईचे करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व अनिल रमेश शिंदे,  प्यारेलाल शिंदे, रवींद्र चव्हाण, शेगर महाराज, भाऊलाल बाबर आदींनी केले.हत्याकांडातील मृतांच्या पीडित कुटबियांना २० लाखाची मदत त्वरित मिळाली पाहिजे, कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी व कुटुंबाचे पुर्नवसन झाले पाहिजे, राईनपाडा ग्रामपंचायत इमारतीच्या ठिकाणी हत्याकांडातील मृतांचे स्मारक उभारावे, नागपूरच्या कळमना येथील बांधवांना जलदगती न्यायालयाद्वारे न्याय देऊन त्यांचे पुर्नवसन करावे, जात दाखल्यासाठी १९६१ च्या वास्तव्याच्या पुराव्याची जाचक अट रद्द करावी, नाथजोगी समाजाला फिरस्तीचे प्रमाणपत्र द्यावे आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा