शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी द्या, अन्यथा मुलांचे अपहरण करू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 21:01 IST

kidnapping, Ransom एक कोटी रूपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू, असे पत्र पाठवून डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी धमकविण्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देडॉक्टर दाम्पत्याला मागितली खंडणी : पत्र पाठवून दिली धमकी, फॅशन डिझयनर महिलेला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एक कोटी रूपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू, असे पत्र पाठवून डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी धमकविण्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. या संवेदनशिल प्रकरणाचा बेलतरोडी पोलिसांनी तपास करून पाच दिवसात छडा लावला. फॅशन डिझायनर असलेल्या शीतल वसंत इटनकर (४५,शिल्पा सोसायटी) या महिलेला अटक केली आहे.

शीतलचा पती एका शासकीय विभागात अभियंता पदावर कार्यरत आहे. त्याला दीड लाख रुपये वेतन मिळते. त्यांनी ५० लाख रुपयांचे कर्ज घेऊन घर बांधले. दर महिन्याला ६० हजार रुपयांची किस्त जाते. उर्वारित पैशात घरखर्च भागत नाही. यामुळे फॅशन डिझायनर असलेल्या शीतलला बुटिक सुरू करायचे होते. पतीने पैसे न दिल्याने नात्यात दुरावा निर्माण झाला होता. सप्टेंबर-२०२० मध्ये कोरोना उपचारासाठी इटनकर दाम्पत्य मनीष नगरातील डॉ. तुषार पांडे यांच्या रुग्णालयात होते. डॉ. पांडे यांच्या पत्नीदेखील चिकित्सक आहेत. पांडे दाम्पत्याच्या प्राक्टीसवरून त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचा अंदाज शीतलला आला होता. त्यांना दोन मुले असल्याचे फेसबूक अकाऊंटवरून तीने शोधले होते. त्या मुलांचे अपहरण करून रक्कम उकळण्याची योजना तीने आखली.

ही योजना अंमलात आणण्यासाठी १० जूनला तीने कुरिअरच्या माध्यमातून धमकीपत्र पाठविले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ते डॉ. पांडे यांना मिळाले. पत्रात दोन्ही मुलांचे अपहरण करण्याची धमकी देऊन प्रत्येकांच्या बदल्यात ५०-५० लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम १७ जूनच्या पहाटे नरेंद्र नगरातील एका निर्जन ठिकाणी ठेवण्याची सूचना देऊन असे न केल्यास मुलांची हत्या करण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर, पोलिसांना कळविल्यास गंभीर परिणाम होतील, असाही इशारा दिला होता.

या पत्रामुळे डॉ. पांडे यांनी ११ जूनलाच बेलतरोडी पोलिसात तक्रार नोंदविली. याच दिवशी १५ वर्षाच्या राज पांडे या मुलाची हत्या झाल्याने पोलीस यंत्रणा सावध झाली. पत्राचा धागा पकडून पोलिसांनी शोध सुरू केला. ओंकार नगरातील एका कुरिअर सेंटरवरून ते पाठविण्यात आले होते. १० जूनला कुरिअरमधून पाठविण्यात आलेल्या सर्व ग्राहकांचे पत्ते मिळवून पोलिसांनी प्रत्येक ग्राहकांकडे चौकशी केली. शीतलने नाव आणि पत्ता खोटा दिल्याने पोलीस तिच्यापर्यंत पोहचू शकले नाही. परिसरातील सीसीटीव्ही तपासणीत मोपेडवरील एक महिला संशयास्पद स्थितीत दिसली. तिचा शोध घेत पोलीस रामटेके नगरात पोहचले. मोपेडच्या क्रमांकावरून या महिलेचे नाव पोलिसांनी मिळविले. रामटेके नगर आणि रक्कम ठेवण्यास सुचविलेल्या नरेंद्र नगराच्या मध्ये शितलचे घर आहे. यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

पोलीस निरीक्षक विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलिसांनी बुधवारी सकाळी शितलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्हा कबूल केला. कुरिअर दुकानदाराने आणि डॉ. पांडे यांनीही तिला उपचारासाठी आली असल्याचे ओळखले. आधी तर तिच्या कृतीवर कुणाचाही विश्वास नव्हता. तिच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर पती आणि मुलींनीही प्रचंड आश्चर्य व्यक्त केले. ही कारवाई डीसीपी डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय आकोत, पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया, हवलदार तेजराम देवले, अविनाश ठाकरे, रणधीर दीक्षित, शैलेश बडोदेकर, मिलिंद पटले, वंदना लोटे, गोपाल देशमुख, कमलेश, बजरंग, नितीन, प्रशांत, राजेंद्र, कुणाल, दीपक, मिथुन यांनी पार पाडली.

अति महत्वाकांक्षा ठरली घातक

पतीच्या वेतनातून मुलींचे शिक्षण आणि घरखर्च सहज करता आला असता. मात्र स्वत:चे बुटिक सुरू करून शीतल बिजनेस वुमन होऊ इच्छित होती. या अती महत्वाकांक्षेपोटी तिने गुन्ह्याचा अविचारी मार्ग स्विकारला. पत्रामुळे घाबरून पांडे दाम्पत्य सहजपणे रक्कम देण्यास तयार होतील, असा तिला विश्वास होता.

ती पहायची वेब सीरीज !

शीतलला वेब सीरीज पहाण्याचे प्रचंड वेड आहे. यातूनच तिने ही योजना आखली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र ती हे नाकारते. कोणत्याही परिस्थितीत पैसा मिळवायचा, हे तिने ठरविले होते. पैशासाठी ती प्रचंड तणावात असल्याने कुटूंबिय तिच्यावर उपचारही करणार होते. तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळवून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :ExtortionखंडणीKidnappingअपहरणArrestअटकWomenमहिला