शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खातेधारकाला ३.५ लाख द्या; नागपूरच्या बँक आॅफ इंडियाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 10:55 IST

संगणकीय सुरक्षाविषयक बाबींमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे पुराव्यांवरून आढळून आल्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवांनी बँक आॅफ इंडियाला दणका दिला आहे.

ठळक मुद्देआयटी कायद्यांतर्गत आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संगणकीय सुरक्षाविषयक बाबींमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे पुराव्यांवरून आढळून आल्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवांनी बँक आॅफ इंडियाला दणका दिला आहे. बँकेच्या चुकीमुळे आर्थिक नुकसान झालेल्या खातेधारकाला ३ लाख ५० हजार रुपये देण्यात यावे असा आदेश देण्यात आला आहे.निर्मलकुमार आठवले असे ग्राहकाचे नाव आहे. ३ लाख ५० हजार रुपयांत आठवले यांच्या स्वत:च्या २ लाख ५० हजार रुपयांचा समावेश आहे. त्यांना तक्रारीच्या खर्चापोटी ८० हजार तर, मानसिक त्रासाकरिता २० हजार रुपये देण्यात आले आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, १७ जानेवारी २०१५ रोजी आठवले यांनी स्वत:च्या व पत्नीच्या नावाने बँक आॅफ इंडियाच्या वैशालीनगर शाखेत संयुक्त बचत खाते उघडले होते. बँकेने त्या खात्यावर न मागता इंटरनेट बँकिंग सुविधा दिली होती. त्यापूर्वी त्यांनी ७ जानेवारी २०१५ रोजी कामठी शाखेत वैयक्तिक बचत खाते सुरू केले होते. ते खाते त्यांनी २१ एप्रिल २०१५ रोजी बंद केले होते. त्या खात्यावर आठवले यांच्या विनंतीवरून इंटरनेट बँकिंग सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर २७ जून २०१५ रोजी आठवले यांना त्यांच्या वैशालीनगर शाखेतील संयुक्त बचत खात्यातून ३ लाख १०० रुपये कपात झाल्याचा मॅसेज आला. त्यामुळे त्यांनी २९ जून २०१५ रोजी बँकेत तक्रार दिली व ४ जुलै २०१५ रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविला. दरम्यान, बँकेने १ जुलै रोजी आठवले यांच्या खात्यात ५० हजार १०० रुपये जमा केले.परंतु, उर्वरित दोन लाख ५० हजार रुपये त्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवांकडे तक्रार दाखल केली होती. आठवले यांच्यातर्फे अ‍ॅड. महेंद्र लिमये व राजेश टेकाळे तर, बँकेतर्फे अ‍ॅड. उमेश देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडिया