शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

८ दिवसांत लेखी माफीनामा द्या, अन्यथा हक्कभंग दाखल होणार; सुषमा अंधारेंबाबत परिषदेत संतप्त प्रतिक्रिया 

By योगेश पांडे | Updated: December 20, 2023 18:11 IST

रवींद्र धनगेकरांना उपसभापतींनी बोलू दिले नाही असा आरोप अंधारे यांनी केला होता.

नागपूर : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपसभापतींबाबत सभागृहाबाहेर चुकीचे वक्तव्य देऊन त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न करणाचा आरोप लावत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याची परवानगी मागितली. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनीदेखील आठ दिवसांत लेखी माफीनामा न आल्यास हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देण्याचे स्पष्ट केले. या मुद्द्यावरून विधानपरिषदेत सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते व विरोधकांनीदेखील उपसभापतींचा अवमान योग्य नसल्याची भूमिका मांडली.

रवींद्र धनगेकरांना उपसभापतींनी बोलू दिले नाही असा आरोप अंधारे यांनी केला होता. प्रत्यक्षात धनगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत व त्यांना बोलण्याची परवानगी तेथील अध्यक्ष देतात. विधापरिषद हे वेगळे सभागृह असून उपसभापती कसे काय परवानगी देऊ शकतात, असा मुद्दा मांडत दरेकर यांनी बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची परवानगी मागितली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील संतप्त झाले व उपसभापतींचा सार्वजनिकपणे अपमान करणे अयोग्य असल्याची भूमिका मांडली. सदस्यांनी कसे वागावे याबाबत आचारसंहिता तयार करण्याचीदेखील त्यांनी मागणी केली. मात्र शशिकांत शिंदे यांनी कुठलीही नोटीस न देता तोंडी हक्कभंग दाखल करण्याची कुठली नवी प्रथा आणली आहे, असा आक्षेप नोंदविला. यावरून सत्ताधारी आक्रमक झाले. लोक संविधानाच्या गोष्टी करतात, मात्र संविधान वाचत नाही. ते अधिकार शोधतात, परंतु कर्तव्य, जबाबदाऱ्या का शोधत नाही असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. सचिन अहीर यांनीदेखील उपसभापतींचा मान राखणे गरजेचे असल्याचे मत मांडले.

पक्षप्रमुखांनी देखील लक्षात आणून दिले नाहीसुषमा अंधारेंचे वक्तव्य मी पाहिले व पाच ते सहा दिवस त्यांना चूक लक्षात येईल अशी प्रतिक्षा केली. त्यांचे पक्षप्रमुखतरी चूक लक्षात आणून देतील असे वाटले होते. मी विधानसभेतील सदस्यांना बोलण्याची परवानगी कशी देईल हे माझ्यासाठी तरी एक मोठे कोडेच आहे. मात्र स्वत:ला सर्वज्ञान म्हणवणाऱ्यांमध्ये दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्यदेखील नाही. त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे. ८ दिवसांत त्यांचा लेखी माफीनामा नाही आला तर हक्कभंग सादर करण्याची परवानगी देण्यात येईल, असे उपसभापतींनी स्पष्ट केले. अनेक आमदारदेखील हवे तसे वागतात. त्यांनी स्वत:चे आत्मपरीक्षण करायला हवे, असेदेखील त्या म्हणाल्या. 

टॅग्स :nagpurनागपूरSushma Andhareसुषमा अंधारे