शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे : महापौर नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:58 IST

आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. याचे सारे श्रेय केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना झेप घेण्यासाठी सावित्रीबाईंनी  आकाश मोकळे करून दिले. मुलींनी आत्मविश्वासाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

ठळक मुद्देपोरी जरा जपूनचा २०० वा प्रयोग उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. याचे सारे श्रेय केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना झेप घेण्यासाठी सावित्रीबाईंनी  आकाश मोकळे करून दिले. मुलींनी आत्मविश्वासाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे, असे आवाहन महापौरनंदा जिचकार यांनी केले.महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विशेष समितीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त गुरुवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सुप्रसिद्ध कवयित्री विजया मारोतकर यांच्या ‘पोरी जरा जपून’ या काव्यमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या २०० व्या प्रयोगाचे विद्यार्थिनीसाठी आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर बोलत होत्या.कार्यक्रमाला कवयित्री विजया मारोतकर,महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, झोन सभापती रूपाली ठाकूर, रिता मुळे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, स्वाती आखतकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, डॉ. मीनाल मोकदम, सरिता मते, विजया ब्राह्मणकर, डॉ. पूजा धांडे, विजया भुसारी, मंजू कारेमोरे, अश्विनी बावनकर आदी उपस्थित होते.प्रारंभी महापौर व सर्व मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. महापौरांच्या हस्ते कवयित्री विजया मारोतकर यांचा सत्कार करण्यात आला. पोरी जरा जपून या सत्यकथन पुस्तकाचे नंदा जिचकार व मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. २५ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून यानिमित्त १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुले व मुलींनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.विजया मारोतकर यांनी उपस्थित शालेय व महाविद्यालयीन मुलींना बदलत्या काळात आधुनिकतेची शाल पांघरताना घ्यावयाची काळजी व संभाव्य धोक्याबाबत सूचक इशारा दिला. आधी आजी-आजोबा घरी मुलांचा सांभाळ करायचे, त्यांना संस्काराचे धडे द्यायचे. आज त्यांना घराची दारे बंद झाल्याने मुले पाळणाघर, शेजारी, कामवाली अशा ठिकाणी सांभाळली जातात. मात्र अशा ठिकाणांमधूनच ८० टक्के मुलींवर अत्याचार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :MayorमहापौरNanda Jichakarनंदा जिचकार