नागपुरात शाळकरी मुलींना पळविणारा गजाआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 08:51 PM2019-07-05T20:51:20+5:302019-07-05T20:52:09+5:30

दोन शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपींचा छडा लावून त्यांना जेरबंद करण्याची कामगिरी पाचपावली पोलिसांनी बजावली. विशेष म्हणजे, या मुलींना पळवून नेणाऱ्या दोन आरोपींमध्ये एक अल्पवयीन आहे. या आरोपींनी त्यांना आपल्या कळमेश्वरच्या नातेवाईकांकडे लपवून ठेवले होते.

Girls kidnapper in Nagpur arrested | नागपुरात शाळकरी मुलींना पळविणारा गजाआड 

नागपुरात शाळकरी मुलींना पळविणारा गजाआड 

Next
ठळक मुद्देफूस लावून नातेवाईकांकडे नेऊन ठेवले : पाचपावली पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपींचा छडा लावून त्यांना जेरबंद करण्याची कामगिरी पाचपावली पोलिसांनी बजावली. विशेष म्हणजे, या मुलींना पळवून नेणाऱ्या दोन आरोपींमध्ये एक अल्पवयीन आहे. या आरोपींनी त्यांना आपल्या कळमेश्वरच्या नातेवाईकांकडे लपवून ठेवले होते.
पाचपावलीच्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुली नेहमीप्रमाणे १ जुलैला घरून सकाळी शाळेत गेल्या. मात्र, शाळा सुटल्यानंतर बराच वेळ होऊनही त्या घरी परतल्या नाही. पालकांनी त्या मुलींचा रात्रीपर्यंत शोध घेतला आणि नंतर पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. दोन शाळकरी मुली एकसाथ बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर तसेच ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलिसांनी मुलींना शोधण्यासाठी धावपळ सुरू केली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यात आरोपी सय्यद जुबेर सय्यद रहमत अली (वय १९, रा. टीपू सुलतान चौक) हा बेपत्ता मुलीपैकी एकीला मोबाईल देताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून त्याची चौकशी केली. त्याला बोलते केले असता त्याने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने दोन्ही मुलींना फूस लावून पळवून नेल्याची कबुली दिली. मुलींना कळमेश्वरमधील नातेवाईकांकडे लपवून ठेवल्याचेही आरोपीने सांगितले. पोलिसांनी गुरुवारी पहाटे कळमेश्वरला जाऊन मुलींना ताब्यात घेतले. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले.
शोधाशोध अन् धावपळ
आरोपींनी मुलींना फूस लावून पळवून नेल्यानंतर आपल्या नातेवाईकांकडे लपवून ठेवले आणि त्यांचा शोध घेण्याचे नाटक करीत मुलींच्या पालकांसोबत धावपळही केली. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेताच आरोपींचा बनाव जास्त वेळ चालला नाही. पोलिसांनी जुबरेला अटक केली. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एस.एस. सुरोशे, उपनिरीक्षक रामटेके, हवालदार चिंतामण डाखोळे, विनोद बरडे, शिपायी नितीन धकाते, रविशंकर मिश्रा, राकेश तिवारी, विनोद बरडे आदींनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Girls kidnapper in Nagpur arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.