शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी मित्रास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:26 IST

केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-पांढुर्णा (मध्य प्रदेश) महामार्गावरील सावळी (मोहतकर) शिवारात असलेल्या नालीच्या काठी शनिवारी (दि. १३) सकाळी तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तिचा डोक्यावर दगड व शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ती ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायची, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यात तिच्या मित्राला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ठळक मुद्देनागपूर-पांढुर्णा महामार्गावरील सावळी (मोहतकर) येथील घटनामृत तरुणी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर/नांदागोमुख ): केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-पांढुर्णा (मध्य प्रदेश) महामार्गावरील सावळी (मोहतकर) शिवारात असलेल्या नालीच्या काठी शनिवारी (दि. १३) सकाळी तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तिचा डोक्यावर दगड व शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ती ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायची, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यात तिच्या मित्राला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.खुशी जगजित परिहार (२०) रा. हिंगणा असे मृत तरुणीचे तर अशरफ अफसर  शेख (२८) रा. गिट्टीखदान, नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जगजित हे तिचे सावत्र वडील होत. तिला ‘मॉडेलिंग’ची आवड होती. ती आईवडिलांपासून वेगळी राहायची. तिने त्यांच्यासोबत संपर्कही तोडला होता. ती राय इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युलियर कॉलेजची विद्यार्थिनी होती. मध्यंतरी ती अशरफच्या संपर्कात आली. दोघेही गिट्टीखदान, नागपूर येथे पाच महिन्यांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे. अशरफ त्याच्या आईवडिलांपासून वेगळा राहात असला तरी तो त्यांच्या संपर्कात होता. शिवाय, ती नेहमीच मित्रांसोबत ‘पब’मध्ये जायची.अशरफ कोणताही कामधंदा करीत नसून, तो वडिलांच्या पैशावर स्वत:च्या व तिच्या संपूर्ण गरजा पूर्ण करायचा. तिचे दुसऱ्यासोबत ‘अफेयर’ असल्याचा त्याला खात्रीलायक संशय होता. तो लक्ष ठेऊन असल्याचे तिच्या ध्यानात आल्याने त्यांच्यात महिनाभरापासून भांडणे सुरू झाली होती. त्यातच तिचा शनिवारी सकाळी सावळी (मोहतकर) शिवारात मृतदेह आढळून आला. तिला केस पकडून किमान १५ फुटांपर्यंत नेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तिचा एक बूट पायात होता तर दुसरा एक फूट उंचावर पडला होता. या मार्गावर रक्ताचे नमुने आणि तिचे केस तसेच घटनास्थळी एक फूट लांब वेणी आढळून आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी केळवद पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.गुन्ह्याची कबुलीस्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अशरफला शनिवारी सायंकाळी गिट्टीखदान (नागपूर) परिसरातून ताब्यात घेतले. त्याने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली देताच रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. त्याने तिला रात्री दारू पाजली आणि फिरायला जाण्याच्या निमित्ताने शहराबाहेर कारने घेऊन गेला. मध्यरात्रीच्या सुमारास तिला सावळी (मोहतकर) शिवारात नेले आणि तिथे तिचा खून करून मृतदेह फेकून दिला. त्यानंतर अशरफ नागपूरला त्याच कारने परत आला. त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली कार (एमएच-०२/एएम-४७६४ होंडा एसीई), शस्त्र व इतर बाबी जप्त करण्यासाठी तसेच यात त्याच्यासोबत सहआरोपी आहे काय, ते पडताळून बघण्यासाठी पोलीस रविवारी (दि. १४) त्याला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडीची न्यायालयाला मागणी करणार आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक