शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

काटोल रेल्वेस्थानकावरून अपहरण केलेली विद्यार्थिनी सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:55 IST

काटोल रेल्वेस्थानकावरून अपहरण केलेली दहाव्या वर्गातील विद्यार्थिनी सुखरुप असून अपहरण करणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

ठळक मुद्देआरोपीस अटक : लोहमार्ग पोलिसांनी लावला छडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल रेल्वेस्थानकावरूनअपहरण केलेली दहाव्या वर्गातील विद्यार्थिनी सुखरुप असून अपहरण करणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.मुकेश भोसले (२९) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मुकेशला पत्नी आणि तीन मुले आहेत. तीन वर्षापूर्वी विद्यार्थिनीची मुकेशसोबत ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. ती अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले. २३ आॅक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास विद्यार्थिनी आपल्या भाऊजीसोबत काटोल रेल्वेस्थानकावर आली. त्यांना मध्य प्रदेशातील मोठ्या बहिणीकडे जायचे होते. गाडीची प्रतीक्षा करीत असताना लघुशंकेला जात असल्याचे भाऊजीला सांगून विद्यार्थिनी गेली. बराच वेळ होऊनही ती परतली नाही. तिच्या भाऊजीने या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. दरम्यान, आई-वडिलांनी लोहमार्ग पोलिसात मुकेशविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला. लोहमार्ग पोलिसांनी मुकेशला मोबाईलवर फोन करून ठाण्यात बोलाविले. मात्र, तो येत नसल्यामुळे सायबर सेलच्या मदतीने त्याच्या मोबाईल क्रमांक ट्रेस केला. तो अमरावती जिल्ह्यातील गौरखेडा, पारधीबेडा (चांदूर रेल्वे) येथे असल्याचे समजताच त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई उपनिरीक्षक संदीप जाधव, उपनिरीक्षक रोशन खांडेकर, रवींद्र सावजी, आशिष श्रीखंडे, गीता नागदिवे आणि अनुज पांडे यांनी केली.

टॅग्स :railwayरेल्वेKidnappingअपहरण