शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम-नागपूर’मध्ये विद्यार्थिनींचा टक्का घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:27 IST

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील वर्षीच्या तुलनेत २०१९-२१ च्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशाचा टक्का घटला आहे.

ठळक मुद्देमागील ‘बॅच’च्या तुलनेत ६ टक्क्यांची घट‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची संख्या वाढीस

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील वर्षीच्या तुलनेत २०१९-२१ च्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशाचा टक्का घटला आहे. यंदा ६ टक्क्यांची घट दिसून आली आहे. मागील ‘बॅच’मध्ये प्रथमच विद्यार्थिनींची संख्या २० टक्क्यांहून अधिक गेली होती. दुसरीकडे यंदा प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये ‘फ्रेशर्स’ची संख्या काही प्रमाणात वाढलेली आहे.‘आयआयएम-नागपूर’ स्थापन झाल्यानंतर पहिले तीन वर्षे विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. २०१८-२० च्या या चौथ्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींची संख्या २२ टक्के इतकी गेली होती. परंतु या वर्षी ‘आयआयएम-नागपूर’मध्ये १२३ प्रवेश असून यातील विद्यार्थिनींची संख्या ही जवळपास १६ टक्के इतकीच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांची घट झाली आहे.‘आयआयएम-अहमदाबाद’सह विविध ‘आयआयएम’मध्ये काही वर्षांपूर्वी विद्यार्थिनींची संख्या फारच कमी होती. मात्र ही टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.‘आयआयएम-नागपूर’मध्ये मागील वर्षीपासून याबाबत पुढाकार घेण्यात आला. मात्र ही संख्या आणखी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा २९ महिन्यांचा सरासरी अनुभव‘आयआयएम-नागपूर’च्या या ‘बॅच’मधील बहुतांश विद्यार्थी कुठे ना कुठे कार्यरत राहून चुकले आहे. यंदाच्या ‘बॅच’मधील ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची टक्केवारी १३ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २ टक्क्यांची वाढ झाली आहे. ५९ टक्के विद्यार्थ्यांना ३ वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव आहे. तर २८ टक्के विद्यार्थ्यांना तीन वर्षांहून अधिक कामाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांचा उद्योगक्षेत्रात कामाचा सरासरी अनुभव हा २९ महिने इतका आहे. तर विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे २५ वर्षे इतके आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र