शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या सतर्कतेमुळे बलात्कारापासून वाचली चिमुकली; नागपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 12:55 IST

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका चार वर्षीय मुलीचे भविष्य अंधकारमय होण्यापासून बचावले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देशेजाऱ्यावर विनयभंगाचा आरोपहुडकेश्वर पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका चार वर्षीय मुलीचे भविष्य अंधकारमय होण्यापासून बचावले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेश दीनानाथ शांडिलकर (वय ३५) याला अटक केली आहे.आरोपी राजेश आणि पीडित परिवार आजूबाजूला राहतात. गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास बाजूची चार वर्षीय चिमुकली आपल्या अंगणात खेळत असताना आरोपी राजेशने तिला खाऊचे आमिष दाखवून उचलून नेले. तो तिला आपल्या घरात घेऊन गेला आणि त्याने दार लावून घेतले. दार लावताना तो संशयास्पद अवस्थेत इकडे तिकडे बघत असल्याने त्याच्या बाजूला राहणाऱ्या एका महिलेने बघितले. तिने आपल्या शेजाऱ्यांना सांगून आरोपी राजेशच्या कलुषित इराद्याबद्दल शंका व्यक्त केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी लगेच त्याच्या दारावर थाप मारून त्याला दार उघडण्यास बाध्य केले आणि चिमुकलीला जवळ घेऊन तिच्या आईकडे नेऊन दिले. त्याची एकूणच अवस्था बघून तो चिमुकलीसोबत लज्जास्पद प्रकार करणार होता, अशी शंका आल्याने शेजाऱ्यांनी त्याची धुलाई केली. त्यानंतर हुडकेश्वर पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेशविरुद्ध विनयभंगाचे कलम ३५४ तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकारामुळे परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले होते. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीचे भविष्य बचावले.

टॅग्स :Molestationविनयभंग