शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

गिरीश गांधींनी घडवून आणला काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार : मुत्तेमवार-ठाकरे गटाची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 08:30 IST

Nagpur News प्रदेश काँग्रेसवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी गुरुवारी सत्कार केला. काँग्रेसला जुने दिवस आणायचे असतील, तर एकसंघ रहा, असा सल्ला मान्यवरांकडून देण्यात आला.

ठळक मुद्देएकसंघ राहण्याचा गांधी-चतुर्वेदींचा काँग्रेसजनांना सल्ला

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रदेश काँग्रेसवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी गुरुवारी सत्कार केला. या सोहळ्यात काँग्रेसला जुने दिवस आणायचे असतील, महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकवायचा असेल तर एकसंघ रहा, असा सल्ला मान्यवरांकडून देण्यात आला. मात्र, दुसरीकडे याच सत्कार सोहळ्याला मुत्तेमवार-ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे पहायला मिळाले. (Girish Gandhi felicitates Congress office bearers)

शंकरनगर चौकातून राष्ट्रभाषा संकुलात आयोजित छोटेखानी सोहळ्यात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, ज्येष्ठ नेते अनंतराव घारड, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, रामकिशन ओझा, नरू जिचकार, संदेश सिंगलकर, कमलेश समर्थ, तक्षशिला वाघधरे, नंदा पराते, रवींद्र दरेकर, हैदरअली दोसानी आदींचा सत्कार करण्यात आला. मात्र, मुत्तेमवार-ठाकरे गटाचे उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, प्रा. विजय बारसे यांनी मात्र वेगवेगळी कारणे देत दांडी मारली. या सर्वांची अनुपस्थिती उपस्थितांनाही खटकली. त्यामुळे भविष्यातही गटबाजी थांबेल याबाबतच शंकाच आहे. प्रास्ताविक अतुल कोटेचा यांनी केले. श्रीराम काळे यांनी आभार मानले.

ईडी, सीबीआयने त्रास दिला तरी काही बिघडत नाही : चतुर्वेदी

- काँग्रेसला भाजपच्या विचारधारेसोबत लढतानाच त्यांचे नेटवर्क व आर्थिक ताकदीशीही लढावे लागेल. आपले लक्ष्य भाजप असायला हवे. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार नव्हे. ईडी, सीबीआयने कितीही त्रास दिला तरी काही बिघडत नाही. जो तुरुंगात गेला तो हिरो बनला, असा इतिहास आहे. लोकांना दमन आवडत नाही. त्यामुळे चिंता न करता काँग्रेस बळकट करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी केले. काँग्रेसने आपल्याला खूप काही दिले. आता निवडणूक लढायची नाही. काही मागायचे नाही. पक्षाचे कर्ज फेडायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी-फडणवीस हे उत्तर-दक्षिण ध्रुव : गांधी

- भाजप नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध उत्तर व दक्षिण धुव्रासारखे आहेत. हे काही आता लपून नाही. मात्र, पक्षाच्या बैठकीत ते एकत्र असतात. एकत्रित निर्णय घेतात, असे सांगून गिरीश गांधी यांनी गडकरी-फडणवीसांमधील वाढत्या दरीवर बोट ठेवले. सोबतच पक्षासाठी त्यांच्या एकीचे उदाहरण देत काँग्रेस कार्यकर्त्यांनीही काही बाबी न पटल्यास प्रसार माध्यमांकडे धाव घेण्याऐवजी पक्षाकडे मत नोंदवावे, असा सल्ला दिला. महापालिकेच्या निवडणुकीत गटतट, वाद बाजूला सारा. आपल्या माणसाला तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षाचा उमेदवार पाडू नका, उलट वॉर्डनिहाय जबाबदारी स्कीकारा, असा सल्लाही गांधी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिला.

गटबाजी सोडून काम करा- घारड

- प्रदेश काँग्रेसवर अनेकांना संधी मिळाली. अनेक कर्मठ कार्यकर्त्यांची नावे राहून गेली. मात्र, पद असो वा नसो पक्षाचे काम करा. काँग्रेसमध्ये नागपूर शहराला एक वेगळे महत्त्व आहे. गटबाजी बाजूला सारून एकत्र या व महापालिका जिंका, असे आवाहन ज्येष्ठ नेते अनंतराव घारड यांनी केले.

आधी नेत्यांनी एकत्र बसावे : ओझा

नागपुरात नेत्यांच्या भांडणात काँग्रेसच्या पुढील तीन पिढ्या भुईसपाट झाल्या आहेत. नेते एकत्र बसल्याशिवाय महापालिकेची निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे कुणाचे पाय पकडायचे असतील तर सांगा, आम्ही तेही करू पण आधी नेत्यांनी आपली भूमिका बदलावी, अशी रोखठोक भूमिका रामकिशन ओझा यांनी मांडली.

टॅग्स :congressकाँग्रेस