शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इस्पितळांच्या नफेखोरीला चाप लावणार : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:10 IST

हृदयशस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या ‘स्टेन्ट्स’च्या किमती जरी कमी झाल्या असल्या तरी इतर शुल्कांचे नाव देऊन काही इस्पितळांकडून रुग्णांची लुबाडणूकच सुरू असल्याच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. मात्र या नफेखोरीला राज्य शासनाकडून चाप बसविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपेट्रोलपंप चालकांना ‘आॅडिट’ अहवाल अनिवार्य‘लोकमत’ला सदिच्छा भेट

आॅनलाईन लोकमतनागपूर : हृदयशस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या ‘स्टेन्ट्स’च्या किमती जरी कमी झाल्या असल्या तरी इतर शुल्कांचे नाव देऊन काही इस्पितळांकडून रुग्णांची लुबाडणूकच सुरू असल्याच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. मात्र या नफेखोरीला राज्य शासनाकडून चाप बसविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे निर्देशदेखील देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली. बापट यांनी मंगळवारी ‘लोकमत’ भवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय विभागासोबत विविध विषयांवर संवाद साधला.इस्पितळांची नफेखोरी बंद व्हावी व सामान्य रुग्णांवर शुल्काचे ओझे पडू नये यासाठी केंद्राकडून ‘स्टेन्ट’प्रमाणे १८ इतर वैद्यकीय उपकरणांचे दर निश्चित करण्यासाठी विचार सुरू आहे. तरीदेखील नफेखोरीसाठी इतर शुल्कांचा मार्ग वापरणाऱ्या  इस्पितळांकडे शासनाचे लक्ष आहे. औषधांच्या किमतीवरदेखील अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आता आम्ही यासंदर्भात सर्व प्रक्रिया आॅनलाईन पोर्टलवर आणण्याचा विचार करत आहोत. औषध दुकानांचे व्यवहार येथे नोंदवावे लागतील व सोबतच वैद्यकीयतज्ज्ञांचे ‘प्रिस्क्रिप्शन’देखील जोडावे लागेल. त्यामुळे गैरव्यवहार कमी होतील, असा दावा बापट यांनी केला. काही पेट्रोलपंपावरदेखील ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही पेट्रोलपंप धारकांना ‘आॅडिट’ अनिवार्य केले आहे. कंपनीच्या प्रतिनिधींवरदेखील जबाबदारी निश्चित केली असल्यामुळे उपकरणांत कुठलाही बदल करणे त्यांना शक्य होणार नाही. ही प्रणाली फक्त महाराष्ट्रातच लागू करण्यात आली आहे, अशी माहिती बापट यांनी दिली. ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन यांनी बापट यांचे स्वागत केले.सभागृहात मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावीगेल्या काही काळापासून राजकीय प्रणालीतदेखील बदल झाले आहेत. आमदार हे आता आत्मकेंद्रित झाले असून स्वत:च्या मतदारसंघापुरताच विचार करताना दिसून येतात. सभागृहात अनेकदा तर विधेयकांवर सखोल चर्चाच होत नाही. जर मूळ प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली तर अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल, असे गिरीश बापट यांनी सांगितले.विदर्भाशी माझी नाळ जुळलेलीयावेळी बापट यांनी विदर्भाशी असलेल्या संबंधांबाबतदेखील माहिती दिली. आम्ही अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या गावचे असून माझ्या वडिलांचे शिक्षण वगैरे तेथेच झाले. आजदेखील तेथे आमचे नातेवाईक राहतात. विदर्भाबाबत माझ्या मनात विशेष जिव्हाळा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :ministerमंत्री