शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रविभवनातील रिकाम्या कॉटेजवर दिग्गजांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:55 IST

अनेक दिग्गज आमदारांची रिकाम्या असलेल्या रविभवनातील कॉटेजवर नजर आहे. काहींनी कॉटेज मिळावे, अशी मागणीही केली आहे.

ठळक मुद्देशिंदे-थोरात घेणार निर्णय 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात केवळ सहा मंत्र्यांचा समावेश असल्याने रविभवन रिकामे पडले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, मंत्री व विरोधी पक्षनेते राहिलेल्या अनेक दिग्गज आमदारांची राहण्याची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेक दिग्गज आमदारांची रिकाम्या असलेल्या रविभवनातील कॉटेजवर नजर आहे. काहींनी कॉटेज मिळावे, अशी मागणीही केली आहे.रविभवनातील कॉटेज हे मंत्र्यांसाठी आहेत. रिकाम्या कॉटेजसंदर्भात निर्णय घेण्यासाठी रविवारी विधिमंडळाची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गृहमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील. या बैठकीत रविभवनातील रिकामे कॉटेज वरिष्ठ आमदारांना द्यायचे की नाही, यावर निर्णय घेतला जाईल. दुसरीकडे सूत्रानुसार रविभवनातील रिकामे कॉटेज त्या दिग्गज आमदारांना मिळण्याची शक्यता आहे, ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री रामदास कदम, विजय वडेट्टीवार, दिवाकर रावते यासारख्या नेत्यांना रविभवनातील रिकामे कॉटेज मिळण्याची शक्यता सूत्रांनुसार नाकारता येत नाही.सुविधा मात्र आमदारांच्याच मिळणारदिग्गज आमदारांना रविभवनातील रिकामे कॉटेज देण्याचा निर्णय झाला तरी त्यांना सुविधा मात्र आमदारांच्याच मिळतील. विशेष म्हणजे प्रोटोकॉलनुसार मंत्र्यांना शासकीय सुविधा मिळतात. आमदारांचा प्रोटाकॉल हा वेगळा असतो. तेव्हा कॉटेज मिळाले तरी त्यांना मंत्र्यांना मिळणाऱ्या सुविधा मिळणार नाहीत. दरम्यान अनेक मोठ्या नेत्यांच्या राहण्याची व्यवस्था शहरातील हॉटेलांमध्ये झालेली आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनRavi Bhavan, Nagpurरविभवन नागपूर