नागपूर : वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेता शहराचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासवर प्रामुख्याने ही जबाबदारी आहे. दिल्ली, मुंबई यासारख्या मेट्रो शहरांच्या धर्तीवर नागपुरात कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, यासाठी मनपा प्रशासन जागेचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे मोक्याच्या ठिकाणी स्वत:च्या जागा उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूर शहरात कन्व्हेंशन सेंटर असावे, अशी संकल्पना मांडली आहे. शहर विकासाला चालना मिळावी, मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व सोबतच बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या दृष्टीने हा प्रस्ताव मनपाच्या विचाराधीन आहे.या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, वाहनांचे प्रदर्शन व विक्री, कार्यशाळा तसेच मोठ्या स्वरूपाचे कार्यक्रम घेता येईल. यातून हॉटेल व वाहतुकीचा व्यवसाय, नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यासोबतच रोजगार निर्मिती होईल, अशी या मागील संकल्पना आहे. प्रस्तावित मेट्रो रेल्वे प्रकल्प, रस्ते आदींचा विचार करून शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे.(प्र्रतिनिधी)डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरकामठी मार्गावरील लाल गोडाऊ नजवळ शासकीय मालकीच्या ७५००चौ.मी. जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा नासुप्रचा प्रस्ताव आहे. यासाठी २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. परंतु हा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर आहे.२००१ चा प्रस्ताव बारगळलानासुप्रने २००१ साली वर्धा मार्गावरील कृषी विद्यापीठाच्या जगोवर कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु कृ षी विद्यापीठाने या प्रकल्पाला जागा देण्यास नकार दिल्याने हा प्रस्ताव बारगळला अशी माहिती नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कन्व्हेन्शन सेंटरसाठी जागा मिळेना
By admin | Updated: January 10, 2015 02:28 IST