शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

जीवनावश्यक वस्तू अ‍ॅपवरून मागवा घरपोच! मनपा आयुक्तांची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:00 IST

लॉकडाऊ नमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून व ग्लोबल लॉजिक व नीती या कंपनीच्या पुढाकारातून ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ हे विशेष अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे ‘फार्म टू होम’ विशेष अ‍ॅप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊ नमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून व ग्लोबल लॉजिक व नीती या कंपनीच्या पुढाकारातून ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ हे विशेष अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. याशिवाय दुकानातील उपलब्ध वस्तूंच्या साठ्यांच्या नोंदणी व पुरवठ्यासाठी दुकानदार किंवा सेवा पुरवठादार यांच्याकरिता ‘बास्केट ओनर’  हेसुद्धा अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनीही विशेष खबरदारी घेत घराबाहेर पडणे टाळावे. नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी मनपातर्फे आवश्यक सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दुकानदार आणि ग्राहक या दोघांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने दोन विशेष अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत. ग्राहकांसाठीच्या फार्म टू होम या अ‍ॅपद्वारे दुकानामध्ये उपलब्ध वस्तूंचा साठा आणि त्याच्या किमती लक्षात घेऊन ग्राहकांना आपली मागणी नोंदविता येईल. त्यानुसार आवश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्यात येईल. बास्केट ओनर हे अ‍ॅप दुकानदार किंवा सेवा पुरवठादारांकरिता तयार करण्यात आले आहे. यासाठी आधी दुकानदार किंवा सेवा पुरवठादारांना आवश्यक माहिती सादर करून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर दुकानामध्ये उपलब्ध वस्तू अथवा मालाची माहिती, साठा, त्याची किंमत याचा तपशील सादर करावा लागेल. सद्यस्थितीत मनपाच्या अधिकृत  संकेतस्थळावरून हे दोन्ही अ‍ॅप डाऊनलोड करता येऊ शकतात. ज्यांना अ‍ॅप डाऊनलोड करणे शक्य नाही त्यांनी ०७१२-२५२२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.संपर्क साधणाऱ्या ग्राहक आणि दुकानदारांना जीवनावश्यक वस्तूंसंदर्भात आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ग्लोबल लॉजिक  कंपनीद्वारे दोन्ही अ‍ॅप तयार करण्यात आले असून त्याला ऋत्विक जोशी यांच्या नीती या कंपनीचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. याशिवाय जे दुकानदार स्वत:च्या मनुष्यबळाद्वारे घरपोच सेवा देण्यास इच्छुक आहेत त्यांनीही अ‍ॅपवर नोंदणी करावी किंवा संपर्क क्रमांकावरून माहिती कळवावी, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका