शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  जिओचा मोबाईल टॉवर सुरू होता चोरीच्या विजेवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:12 IST

रिलायन्स जिओकडून विजेची चोरी करून टॉवर चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनी फ्रेंचाईजी एसएनडीएलने बोरगाव रोडवरील योगेंद्रनगरात कारवाई केली. एमएसबीसी स्वीचच्या माध्यमातून वीज मीटरला होणारा पुरवठा थेट वळवून रोज जवळपास सहा केडब्ल्यू वीजचोरी केली जायची, अशी माहिती एसएनडीएलने दिली आहे.

ठळक मुद्देएसएनडीएलची कारवाई : रोज ६ किलोवॅॅटचा व्हायचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिलायन्स जिओकडून विजेची चोरी करून टॉवर चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनी फ्रेंचाईजी एसएनडीएलने बोरगाव रोडवरील योगेंद्रनगरात कारवाई केली. एमएसबीसी स्वीचच्या माध्यमातून वीज मीटरला होणारा पुरवठा थेट वळवून रोज जवळपास सहा केडब्ल्यू वीजचोरी केली जायची, अशी माहिती एसएनडीएलने दिली आहे.जिओच्या या मोबाईल टॉवरसाठी जानेवारीमध्ये विद्युत पुरवठा दिला होता. त्याचा ग्राहक क्रमांक ४१००२२८८८२११ असा आहे. हे कनेक्शन रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या नावाने आहे. मात्र कंपनी विजेचे बिल भरत नव्हती. अखेर १५ दिवसांचा नोटीस देऊन २८ जूनला वीजपुरवठा कापण्यात आला तरीही टॉवर सुरूच होता. जनरेटरचा उपयोग करून टॉवर चालवीत असल्याचा देखावा कंपनीने केला होता. यादरम्यान जिओने १९ जुलैला थकबाकी रक्कम भरली, मात्र चालू महिन्याचे बिल भरले नव्हते. त्यामुळे वीजपुरवठा सुरू केला नव्हता.याच दरम्यानच्या काळात वीज वितरण कंपनी फ्रेंचाईजी एसएनडीएलला ट्रान्सफार्मरबद्दल शंका आली. त्यामुळे आपल्या पथकाला तपासकामी लावले. जनरेटर बंद असतानाही टॉवर सुरूच असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. या आधारावर २ ऑगस्टला पथकातील सहा सदस्यांनी परिसराची तपासणी सुरू केली. यात ही वीजचोरी आणि त्यासाठी लावलेल्या स्वीचचा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी उपस्थित असलेले संदीप बाळबुधे यांनी चोरीची वीज टॉवरसाठी वापरत असल्याचे मान्य केले.५४ हजाराची चोरी आणि ६० हजारांचा कम्पाऊंडिंग चार्जएसएनडीएलने वीजपुरवठा खंडित करण्याची तारीख २८ जून गृहित धरून ३५ दिवस ही चोरी सुरू असल्याचा अंदाज लावला आहे. चोरीच्या विजेचे मूल्य ५४ हजार ४३० रुपये दर्शविण्यात आले आहे. यासोबतच ६० हजार रुपयांचे कम्पाऊंडिंग शुल्क असा अतिरिक्त भरणा शुल्कही लावण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू होती. वृत्त लिहिपर्यंत जिओने दंडाचे शुल्क भरलेले नव्हते.

टॅग्स :electricityवीजtheftचोरी