शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कामगार चळवळीबाबत ‘जॉर्ज’ होते चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 11:33 IST

राज्यातील कामगार चळवळीत माजी केंद्रीय मंत्री व धडाडीचे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे मौलिक योगदान होते.

ठळक मुद्दे‘माफिया’करणावर व्यक्त केली नाराजी

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील कामगार चळवळीत माजी केंद्रीय मंत्री व धडाडीचे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे मौलिक योगदान होते. राज्यातील कामगार चळवळीतील स्थित्यंतरे त्यांनी अनुभवली होती. अनेक क्षेत्रातील चळवळींना स्वत:च्या लढवय्या स्वभावाने बळ दिले होते. मात्र सक्रियतेच्या अखेरच्या काळात याच चळवळीबाबतच्या भविष्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले होते. देशातील कामगार चळवळ विभागीत होत असल्याबाबत त्यांनी नागपुरातच चिंता व्यक्त केली होती व भविष्यातील अस्तित्वाबाबत भीतीदेखील बोलून दाखविली होती.२८ जून २००५ रोजी ‘संपुआ’चे निमंत्रक असलेले फर्नांडिस नागपूर दौऱ्यावर आले होते. एका दिवसात तीन ते चार कार्यक्रम करणे ही त्यांची अगोदरपासूनची सवय होती. त्यानुसार त्या दिवशी नागपुरात त्यांनी मोर भवनात आयोजित हिंद मजूदर किसान संघाच्या एका सभेत कामगार चळवळीसमोरील आव्हाने व भविष्य यावर व्याख्यान दिले होते. भारतीय कामगार चळवळ ही ‘सेक्युलर’ व ‘नॉनसेक्युलर’मध्ये विभागली गेली आहे. चळवळीत धर्माचा शिरकाव झाल्याने मूळ उद्देशापासून ती भरकटली जात आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले होते.कामगार चळवळीत माफियादेखील शिरले आहेत. अशास्थितीत कामगार चळवळीचे भविष्य अंधकारमय आहे, अशी भीती त्यांनी बोलून दाखविली होती. यावेळी त्यांनी ‘संपुआ’ सरकारच्या आर्थिक धोरणांवरदेखील जोरदार टीकाकेली होती.

संघस्थानी झालेली ‘ती’ भेटजॉर्ज फर्नांडिस हे समाजवादी विचारसरणीचे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाºयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच दिवशी त्यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी तत्कालीन सरसंघचालक डॉ.के.सी.सुदर्शन व सरकार्यवाह डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली होती व सुमारे साडेतीन तास ते मुख्यालयात होते. त्यावेळी राजकीय परिस्थिती, कम्युनिस्ट पक्ष यावर चर्चा झाली होती. विशेष म्हणजे इंदिरा गांधी यांची प्रशंसा केल्याबद्दल फर्नांडिस यांनी काही दिवस अगोदरच सरसंघचालकांबाबत नाराजी व्यक्त केली होती.सरकारे आएंगी-जाएंगी...यावेळी कामगारांच्या बळकटीकरणावर त्यांनी जोर दिला होता, ‘सरकारे आएंगी-जाएंगी, लेकिन मजदूर की ताकद रहनी चाहिए’ असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले होते. कामगारांमुळेच शेतकरी तसेच लहान उद्योजकांना बळ मिळते. जर कामगारच शक्तिहीन झाला तर लोकशाहीचे ताळतंत्रच बिघडेल, असे त्यांचे मत होते.

नेत्यामध्ये दडला होता कट्टर कार्यकर्ताफर्नांडिस हे राष्ट्रीय स्तरावरील नेते असले तरी त्यांच्यातील एक कट्टर कार्यकर्ता नेहमीच दिसून यायचा. नागपुरातदेखील याचा अनुभव आला होता. २००५ साली नागपुरात सरसंघचालकांशी भेट घेण्यासाठी आले होते. त्यादिवशी झाशी राणी चौकातील मोर भवनात जॉर्ज फर्नांडिस यांचे दुपारी ४ वाजता व्याख्यान होते. ते आटोपल्यानंतर ते मोटारीने पत्रकार संघाकडे निघाले. चौकातच कम्युनिस्ट पक्षातर्फे पेट्रोल दरवाढीविरुद्ध आंदोलन सुरू होते. कम्युनिस्टांचा केंद्राला पाठिंबा असतानादेखील शासनाविरोधातच नारे दिले जात होते. यावेळी माझीही तेथे जाऊन नारेबाजी करण्याची इच्छा झाली होती, अशी भावना फर्नांडिस यांनी नागपुरात बोलून दाखविली होती. 

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिस