शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘प्रिस्क्रिप्शन’वर जेनेरिक औषधे कधी

By admin | Updated: October 19, 2015 02:33 IST

सर्वसामान्यांना कमी किमतीत औषध उपलब्ध व्हावे, यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून देशभरात केंद्र सरकार ‘पंतप्रधान जेनेरिक औषध योजना’ राबविणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

खासगीसह शासकीय डॉक्टरही उदासीन : सरकारकडून ठोस निर्देश हवेतलोकमत विशेषसुमेध वाघमारे नागपूरसर्वसामान्यांना कमी किमतीत औषध उपलब्ध व्हावे, यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून देशभरात केंद्र सरकार ‘पंतप्रधान जेनेरिक औषध योजना’ राबविणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. मात्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत (डीएमईआर) येणारे मेडिकलमधील डॉक्टर असो किंवा खासगी इस्पितळातील डॉक्टर ‘प्रिस्क्रिप्शन’वर जेनेरिक औषधे लिहून देत नसल्याचे वास्तव आहे. वाढत्या महागाईच्या काळात अनेकांना खासगी डॉक्टरांचे शुल्कासह औषधांच्या किमती परडवत नाही, परिणामी शासकीय रुग्णालयाची वाट धरतात. परंतु येथेही औषधांच्या तुटवड्यामुळे अनेक औषधे बाहेरून घ्यावी लागतात. विशेष म्हणजे, विविध कंपन्यांकडून त्यांच्या औषधविक्रीचे प्रमाण वाढवण्यासाठी डॉक्टरांना सवलती, भेटवस्तू दिल्या जातात, हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे काही डॉक्टर जेनेरिक औषधांऐवजी संबंधित कंपन्यांची ब्रॅण्डेड औषधे लिहून देतात. मात्र सर्वच डॉक्टरांबाबत हे खरे नाही. काही डॉक्टरांच्या मते, जेनेरिक औषधे लिहून देण्यास हरकत नाही. मात्र अन्न व औषधे प्रशासनाकडे (एफडीए) पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्याने जेनेरिक औषधांची गुणवत्ता तपासून पाहिली जाते की नाही यावर संशय आहे.जेनेरिक औषधेच का?‘प्रिस्क्रिप्शन’वर जेनेरिक औषधे कधी?नागपूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकानुसार जेनेरिक औषधे गुणवत्तेच्या तुलनेत कुठेही कमी नाही. जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने आधीच वसूल केलेला असतो. त्यामुळे केवळ औषधनिर्मितीच्या उत्पादन खचार्नुसार त्यांची किंमत ठरवली जात असल्याने ही किंमत मूळ ब्रॅण्डेड औषधांपेक्षा खूप कमी होते. असे असतानाही देशात ब्रॅण्डेड नावाने अधिक किमतीत हीच औषधे विकली जातात. या ब्रॅण्डेड औषधांमुळे रुग्णांना मोठी किंमत चुकवावी लागते.आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांना भारतात औषध विकण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागते. सरकारने मंजुरी देताना या कंपन्यांवर ५० टक्के जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याचे बंधन घालणे आवश्यक आहे. या सोबतच सरकारने पुढाकार घेत सर्वत्र जास्तीत जास्त जेनेरिक औषधांची दुकाने उघडल्यास, जेनेरिक औषधांचा वापर वाढेल. नाहीतर, ‘डॉक्टरांनी जेनेरिक औषधेच लिहून द्या’ ंअसे करण्यात येणारे आवाहन केवळ ‘फॅशन’बनून राहील.-डॉ. किशोर टावरीअध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलएमसीआयच्या सूचनांकडेही दुर्लक्षमेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या २००२ च्या नियमानुसार डॉक्टरांनी शक्यतो जेनेरिक औषधेच रुग्णांना लिहून देण्याच्या सूचना आहेत. मात्र, औषध कंपन्या व डॉक्टरांमधील साटेलोट्यामुळे रुग्णांना स्वस्त दरातील औषधे उपलब्ध होत नाहीत. स्वस्त व दर्जेदार जेनेरिक औषधे लिहून न देणाऱ्या डॉक्टरांची नोंदणीच रद्द करण्याची शिफारस मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने केली आहे. परंतु अद्यापही अंमलबजावणी नाही.