शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य वीज ग्राहकांवर ५२७ कोटी रुपयांचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:06 IST

Nagpur : कोळशामुळे फेब्रुवारी महिन्यातील प्रत्येक युनिटवर इंधन समायोजन शुल्क आकारणार

कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोव्हेंबर २०२४ मध्ये महावितरणला महाराष्ट्रात वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली. आता २५ फेब्रुवारीमध्ये या खरेदीवर खर्च झालेल्या ५२७.७३ कोटी रुपयांची वसुली सामान्य लोकांकडून केली जाणार आहे. यासाठी वीज प्रतियुनिट एक रुपयाने महागणार आहे. या वसुलीचे एक प्रमुख कारण म्हणजे औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाऱ्या कोळशाचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही.

महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाने महावितरणला फेब्रुवारी महिन्यात इंधन समायोजन शुल्क (एफएसी) वसूल करण्याचे आदेश देताना हा खुलासा केला आहे. आयोगाने म्हटले आहे की, महावितरणने नोव्हेंबरमध्ये औष्णिक वीज केंद्रांमध्ये वापरलेल्या कोळशाचा चाचणी अहवाल आलेला नाही. या कारणास्तव महाजेनकोने तात्पुरते एफएसी बिल दिले आहे. अशा स्थितीत उष्मांक मूल्य (ज्वलनशील क्षमता) अर्धे मानले जाते. खापरखेडा वीज केंद्र वगळता राज्यातील इतर वीज केंद्रांमध्ये हा दर १८.३६ टक्क्यांनी वाढला आहे. याच कारणामुळे महाजेनकोचे एफएसी बिल जास्त आल्याचे बोलले जात आहे. या आधारे महावितरणने ५२७.७३ कोटी रुपये अतिरिक्त खर्चाचा अंदाज लावला आहे.

अनेक युन्टिस बंद, विना परवानगी उत्पादनआयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, नोव्हेंबरमध्ये विजेची मोठी मागणी होती. दुसरीकडे, महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रातील अनेक युनिट देखभाल दुरुस्तीसह अन्य कारणांमुळे बंद राहिले. अशा परिस्थितीत हे संकट टाळण्यासाठी परळी ६, ७ आणि ८ सह उरण प्रकल्पातील वीजनिर्मिती युनिटमधून उत्पादन घ्यावे लागले. हे तीन युनिट एम.ओ.डी मध्ये नाहीत. म्हणजे त्यांच्यापासून उत्पादित होणाऱ्या विजेचे दर आयोगाने निश्चित केलेले नाहीत. साहजिकच महावितरणला ही वीज महागड्या दराने मिळाली.

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज