शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘कोरोना’वर गाजणार महासभा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 11:10 IST

नागपुरात २० जूनला होणारी मनपाची सर्वसाधारण सभा ‘कोरोना’वर गाजणार असल्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देप्रतिबंधित क्षेत्र व क्वारंटाईन केंद्रांवरील गैरसोयींबाबत जाब विचारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार नागपूर शहरातील कोरोनाची परिस्थिती हाताळल्याने संसर्ग आटोक्यात ठेवल्याचा मनपा प्रशासनाचा दावा आहे. तर प्रशासनाने पदधिकाऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने नागरिकांना होत असलेला त्रास व क्वारंटाईन सेंटरवर सुविधांचा अभाव असल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी, अशा मुद्यावरून प्रशासनाला जाब विचारण्याची नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे.यामुळे २० जूनला होणारी मनपाची सर्वसाधारण सभा ‘कोरोना’वर गाजणार असल्याचे संकेत आहेत.तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मनपा प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. मोमिनपुरा येथील कत्तलखाना सुरू असल्याने संसर्ग वाढल्याचा दावा आरोग्य विभागातील अधिकाºयांनी केला होता. तर मनपा प्रशासनाच्याच परवानगीने हा कत्तलखाना सुरू असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. कोरोनासंदर्भात नोटीस बजावली असून ती कामकाजात समाविष्ट करण्यात आली आहे.क्वारंटाईन सेंटरवरील नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. कोरोनाची लागण झालेले आणि न झालेल्यांना एकाच ठिकाणी ठेवले गेले. सामूहिक शौचालयामुळे संसर्गाचा निर्माण झालेला धोका, सुरुवातीला अन्नात अळ्या निघाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.यामुळे मनपाची झालेली बदनामी, मनपा आयुक्त हे कुणाचेही ऐकत नाहीत, निर्णय प्रक्रियेत पदाधिकाºयांना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संयुक्त पत्रकार परिषदेतून दिला होता. याचे पडसाद सर्वसाधारण सभेत दिसणार आहेत. तसेच शहरातील कचरा संकलन, रखडलेली विकास कामे, सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन व नियुक्ती अशा मुद्यावरून नगरसेवक आक्रमक आहेत.

भट सभागृहात प्रथमच महासभाकोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून महापालिकेची एकही सर्वसाधारण सभा झाली नाही. नियमानुसार प्रत्येक महिन्यात एक सभा होणे अपेक्षित आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यापासून चित्र सर्वसामान्य होत आहे. तरी सोशल डिस्टन्सिंग हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे प्रथमच कविवर्य सुरेश भट सभागृहात महासभा आयोजित करण्यात आलेली आहे. महापालिकच्या महाल स्थित टाऊन हॉलमध्ये ही सभा होत असते.

वाहतूक कोंडीचा तिढा सुटणारशहरात पार्किंग व्यवस्था नसल्याने अस्ताव्यस्त अशी वाहने उभी करण्यात येतात. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी महापालिकेने मे. यू.एम.टी.सी., हैदराबाद येथील कंपनीला शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबत सर्वेक्षण करून पार्किंग व्यवस्थापनेचा आराखडा सादर करण्यास सागितले होते. त्यानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका