शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिक संबंध; कुणी केले स्वागत, कुणी म्हटले निर्णय चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 10:18 IST

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अनैसर्गिक संबंधासंदर्भात दिलेल्या निर्णयावर शहरातील विधिज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी निर्णयाचे स्वागत केले तर, काहींनी निर्णय चुकीचा ठरवला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अनैसर्गिक संबंधासंदर्भात दिलेल्या निर्णयावर शहरातील विधिज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी निर्णयाचे स्वागत केले तर, काहींनी निर्णय चुकीचा ठरवला. त्यापैकी निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे.

निर्णय योग्य आहेसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. आपण आतापर्यंत ‘इंटरनॅशनल डिक्लेरेशन’च्या विरोधात वागत होतो. ‘इंटरनॅशनल डिक्लेरेशन’मध्ये अनैसर्गिक संबंधाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच, हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असल्याचे स्वीकारण्यात आले आहे. अशावेळी भारतीय नागरिकांना सतत दहशतीत ठेवणे अमानवीय होते. हा निर्णय खूप आधी यायला हवा होता.- अ‍ॅड. फिरदोस मिर्झा.

चुकीचा निर्णय आहेसर्वोच्च न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला. अनैसर्गिक संबंधाला मान्यता दिली जाऊ शकत नाही. अनैसर्गिक संबंध ठेवणे गुन्हा ठरविण्यात आला होता म्हणून असे प्रकार नियंत्रणात होते. परंतु, आता अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. अशा घटना कारागृहामध्ये सर्वाधिक घडतात. त्याचा विचार व्हायला हवा होता. या निर्णयाचे दुष्परिणाम भविष्यात पहायला मिळतील.- अ‍ॅड. शशिभूषण वाहणे.

निर्णय स्वागतार्ह आहेसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. या देशामध्ये सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तसेच, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी सहमतीने ठेवलेले अनैसर्गिक संबंध गुन्हा ठरू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आता सरकारने या निर्णयानुसार कायद्यामध्ये तातडीने आवश्यक बदल करून घ्यायला पाहिजे.- अ‍ॅड. राजेंद्र डागा.

 

 

टॅग्स :Gay Marriageसमलिंगी विवाह