वर्षभरात गॅस सिलिंडर २४० रुपयांनी वाढले; सबसिडी ४०.१० रुपयेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:32 AM2021-07-21T00:32:34+5:302021-07-21T00:33:14+5:30

Gas cylinders increased घरगुती गॅस हा रोज लागणाऱ्या गोष्टींपैकी एक असल्यामुळे तो खरेदी केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. याच कारणामुळे देशातील नागरिकांची प्रचंड कोंडी झाली आहे. सध्या पेट्रोल, डिझेल, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती आकाशाला भिडल्या असून महागाईनेही कळस गाठला आहे.

Gas cylinders increased by Rs 240 during the year; The subsidy is only Rs. 40.10 | वर्षभरात गॅस सिलिंडर २४० रुपयांनी वाढले; सबसिडी ४०.१० रुपयेच

वर्षभरात गॅस सिलिंडर २४० रुपयांनी वाढले; सबसिडी ४०.१० रुपयेच

googlenewsNext
ठळक मुद्देगरीब, सामान्यांना झटका : शहरात चूल पेटविता येत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : घरगुती गॅस हा रोज लागणाऱ्या गोष्टींपैकी एक असल्यामुळे तो खरेदी केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. याच कारणामुळे देशातील नागरिकांची प्रचंड कोंडी झाली आहे. सध्या पेट्रोल, डिझेल, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती आकाशाला भिडल्या असून महागाईनेही कळस गाठला आहे. बहुतांश नागरिक कमी उत्पन्नात कुटुंबाचा खर्च चालवित आहे. कोरोना काळात जीवनाश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याऐवजी सरकार दरवाढ करीत असल्याने नागरिक सरकारला दोष देत आहेत. विविध ग्राहक संघटनांसह महागाई कमी करण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे.

सर्व स्तरावर दरवाढ कमी करण्याची मागणी

वर्षभरात १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल २४२ रुपयांची वाढ होऊन भाव जुलैमध्ये ८८६ रुपयांवर पोहोचले आहेत. याशिवाय १९ किलो वजनाचे व्यावसायिक सिलिंडरचे भाव वर्षभरात ४३५ रुपयांनी वाढून १६९२ रुपयांवर गेले आहेत. दर कमी करण्याची हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांची मागणी आहे. केंद्र सरकार स्वयंपाकघरातील वस्तूंची वाढ करीत असल्याने महिन्याचे बजेट कोसळले आहे. दुसरीकडे खाद्य तेलासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचीही दरवाढ सुरूच आहे. कोरोनामुळे नोकरदारांचे उत्पन्न कमी झाले आहे, त्यातच दरवाढ करून सरकार सर्वसामान्यांना झटका देत असल्याचे गृहिणींनी सांगितले. आता सर्वच स्तरावर सिलिंडरची दरवाढ कमी करण्याची मागणी होत आहे.

सबसिडी काढून घेण्याचा सरकारचा डाव

ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव गजानन पांडे म्हणाले, गॅस सिलिंडरची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारला कमी खर्च येतो. पण त्यावरील करांमुळे गॅस सिलिंडरच्या किमतीत अतोनात वाढ झाली आहे. वर्षभरापासून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी ब्लॉक केल्याचे दिसून येत आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे प्राईज रेट ५८० रुपये ठरविले होते. सिलिंडरचे दर आणि प्राईज रेटमधील फरक म्हणजे सबसिडी. ही सबसिडी ग्राहकांच्या बँक खात्यात जमा व्हायची. वर्षभरात सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतरही त्या प्रमाणात ग्राहकांना सबसिडी मिळाली नाही. गेल्यावर्षीच्या जुलैपासून ग्राहकांच्या खात्यात केवळ ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पुढे ग्राहकांना सबसिडी मिळणार नाही आणि सर्वांना बाजारभावात सिलिंडर खरेदी करावे लागेल. खासगी कंपन्यांना मदत करण्याचा सरकारचा डाव असल्याचे पांडे म्हणाले.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर

ऑगस्ट- ६४४

सप्टेंबर ६४४

ऑक्टोबर ६४६

नोव्हेंबर ६४६

डिसेंबर ६४६

जानेवारी ७४६

फेब्रुवारी ७४६

मार्च ८७१

एप्रिल ८६१

मे ८६१

जून ८६१

जुलै- ८८६

एकीकडे गॅसचा खर्च वाढला असताना कोरोनामुळे नोकरदारांचे पगार कमी झाले आहे. तेल कंपन्या दर महिन्याला सिलिंडरचे दर वाढवून कुटुंबावर अनावश्यक भार टाकत आहे. बाजारपेठांमध्ये सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. स्वयंपाकघराचे नियोजन ही आता तारेवरची कसरत झाली आहे.

शीतल यादव, गृहिणी.

गॅस सिलिंडरच्या किमतीसह किराणा, खाद्यतेल आणि अन्य वस्तूंचे भाव वाढले आहेत. दुसरीकडे उत्पन्न कमी झाले आहे. महिन्याचा घरखर्च कसा चालवायचा याची चिंता आहे. आता चुलही पेटविता येत नाही. कोणत्याही वस्तूंचे दर वाढविताना सरकारने गरीब व सामान्यांचा विचार करावा.

कोमल दैने, गृहिणी.

Web Title: Gas cylinders increased by Rs 240 during the year; The subsidy is only Rs. 40.10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.