शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

सराफांची काळी गुढी

By admin | Updated: April 8, 2016 02:37 IST

सन १९६२ नंतर पहिल्यांदा गुढीपाडव्याला सराफांची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे यंदा १०० कोटींचा व्यवसाय ठप्प होईल,

१०० कोटींचा व्यवसाय बुडणार : ५४ वर्षांनंतर दुकाने पहिल्यांदा बंद राहणारमोरेश्वर मानापुरे नागपूर सन १९६२ नंतर पहिल्यांदा गुढीपाडव्याला सराफांची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे यंदा १०० कोटींचा व्यवसाय ठप्प होईल, शिवाय काळी गुढी उभारून सराफा व्यापारी केंद्र सरकारच्या अबकारी कर आकारणीचा निषेध करणार आहे.ग्राहक मुहूर्ताच्या खरेदीला मुकणारसाडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारपेठांमध्ये उत्साह असतो. काही ग्रॅम सोने खरेदीचा प्रत्येकाचा अट्टाहास असतो. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरूमची सजावट करण्यात येते. पण यंदा गुढीपाडव्याला अबकारी कराच्या विरोधात सराफांनी पुकारलेल्या बंद आंदोलनामुळे नागपुरातील ३५०० पेक्षा जास्त दुकाने आणि मोठ्या सराफांसह नामांकित कंपन्यांची जवळपास २० शोरूम बंद राहतील.आंदोलन सुरूच राहीलनागपूर : बंदमुळे ग्राहकांची गैरसोय होणार असून मुहूर्ताच्या खरेदीला ते मुकतील. सराफा व्यापारी शुक्रवारी गुढीपाडव्याला काळी गुढी उभारणार आहे. केंद्र सरकारच्या अबकारी कर आकारणीचा निषेध करणार आहे. सराफांनी नेहमीच सरकारच्या ध्येयधोरणाचा स्वीकार केला आहे. या कराला आमचा विरोध नाही. कारण हा कर आम्ही ग्राहकांकडूनच वसूल करू. पण त्यातील जाचक अटी आमचा व्यवसाय संपुष्टात आणणाऱ्या आहेत. त्या अटींना आमचा विरोध आहे. कर पूर्णत: रद्द होईपर्यंत बंद आंदोलन सुरूच राहील, असे रोकडे यांनी स्पष्ट केले. दुकान उघडणाऱ्यांवर दंडव्यापाऱ्यांचे बंद आंदोलन आता तीव्र झाले आहे. कोणताही सराफा व्यापारी गुढीपाडव्याला दुकान उघडणार नाही. पण जो दुकानदार गुढीपाडव्याला दुकान उघडेल, त्यांच्याकडून ११ हजार रुपये दंड स्वरूपात आकारण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शहरात विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आपापल्या भागात दुकाने बंद आहेत की नाही, याची शहानिशा करीत आहेत. शटर बंद करून आत काम सुरू असेल तर त्यांना काम बंद करण्यास बाध्य करीत आहेत. सराफा व्यापाऱ्यांमध्ये एकजूटता असावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. व्यापाऱ्यांची एकजूटता राहावी म्हणून गुढीपाडव्याला काळी गुढी उभारून निषेध करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)